गँगस्टरच्या एन्काऊंटरनंतर संतप्त जमावाचा पोलिसांवर हल्ला, वाहनांची जाळपोळ

By Admin | Published: July 13, 2017 08:56 AM2017-07-13T08:56:16+5:302017-07-13T08:56:16+5:30

एका गँगस्टरच्या एन्काऊंटरमुळे हिंसक झालेल्या जमावाने केलेल्या हल्ल्यात 20 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत

After Gangster's encounter, the angry mob attacked the police, vehicles fire | गँगस्टरच्या एन्काऊंटरनंतर संतप्त जमावाचा पोलिसांवर हल्ला, वाहनांची जाळपोळ

गँगस्टरच्या एन्काऊंटरनंतर संतप्त जमावाचा पोलिसांवर हल्ला, वाहनांची जाळपोळ

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 13 - एका गँगस्टरच्या एन्काऊंटरमुळे हिंसक झालेल्या जमावाने केलेल्या हल्ल्यात 20 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आनंदपाल सिंह असं या गँगस्टरचं नाव होतं. गेल्या महिन्यात त्याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. एन्काऊंटरची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करत लोकांनी मोर्चा काढला होता.  ही बनावट चकमक असल्याचा आरोप लोकांनी केला असून याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. मात्र मोर्चाला अचानक हिंसक वळण मिळाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली होती. 
 
जमावाने पोलीस पथकावर दगडफेक केली, तसंच पोलीस वाहन आणि चार बसेस जाळून टाकल्या. बुधवारी संध्याकाळच्या दरम्यान हा सर्व प्रकार झाला. नागौर जिल्ह्यातील ही घटना आहे. जमावाने केलेल्या हल्ल्यात 20 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) एनआरके रेड्डी यांनी दिली आहे. यामध्ये एका सामान्य व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गावात कर्फ्यू लागू केला आहे. सोबतच नागौर, चूर, सिकर आणि बिकानेर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे. 
 
तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असून त्यांना जयपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 24 जून रोजी चुरु जिल्ह्यात गँगस्टर आनंदपाल सिंहचा एनकाऊंटर झाला होता. सीबीआय चौकशीची मागणी करण्यासाठी राज्यातील अनेक गावांमधून हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले होते. 
 
आनंदपाल सिंह आत्मसमर्पण करण्यासाठी तयार असतानाही त्याची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. तसंच हे एक राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कुटुंबाने अद्याप मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. 
आंदोलनकर्त्यांनी रेल्वे ट्रॅकचंही नुकसान केलं असून यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. अनेक रेल्वेंचा मार्ग बदलण्याची नामुष्की रेल्वे अधिका-यांवर ओढावली होती. परिसरात आंदोलन होणार असल्याची कल्पना असल्याने पोलिसांची कुमक पाठवण्यात आली होती. तसंच 144 कलम लागू करत जमाबंदीचा आदेशही लागू करण्यात आला होता. 
 

Web Title: After Gangster's encounter, the angry mob attacked the police, vehicles fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.