गुजरात, हिमाचल उरकल्या, आता जम्मू- काश्मीरमध्ये ‘मिशन निवडणूक’ सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 10:22 AM2022-12-12T10:22:35+5:302022-12-12T10:22:52+5:30

येत्या एप्रिल- मेमध्ये विधानसभेचा बिगुल? राज्यात तीन मोठ्या निवडणुकांची तयारी केली जात आहे.  

After Gujarat, Himachal, now 'Mission Election' begins in Jammu-Kashmir | गुजरात, हिमाचल उरकल्या, आता जम्मू- काश्मीरमध्ये ‘मिशन निवडणूक’ सुरू

गुजरात, हिमाचल उरकल्या, आता जम्मू- काश्मीरमध्ये ‘मिशन निवडणूक’ सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीनगर : जम्मू- काश्मीरमधील सुरक्षा स्थिती चांगली राहिल्यास पुढील वर्षी एप्रिल किंवा मे २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींचाही पाच वर्षांचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. तिन्ही निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय पक्षांबरोबरच प्रशासनानेही यासाठी सक्रियता वाढवली आहे. 

 निवडणूक आयोगाने पुढील आदेशापर्यंत मुख्य निवडणूक अधिकारीपदाचा कार्यभार संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी अनिल सालगोत्रा यांच्याकडे सोपवला आहे. पंचायत मतदार याद्या तयार करण्याचे कामही पुढील आठवड्यापासून जिल्हास्तरावर सुरू होणार आहे. अशा स्थितीत राज्यात तीन मोठ्या निवडणुकांची तयारी केली जात आहे.  

Web Title: After Gujarat, Himachal, now 'Mission Election' begins in Jammu-Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.