मसरतच्या अटकेनंतर काश्मिरात धुमश्चक्री
By admin | Published: April 18, 2015 01:49 AM2015-04-18T01:49:10+5:302015-04-18T08:16:59+5:30
फुटीरवादी मसरत आलम भटच्या अटकेनंतर श्रीनगरमध्ये हुरियत कॉन्फरन्सच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने केली.
फुटीरवादी मसरत आलम भटच्या अटकेनंतर श्रीनगरमध्ये हुरियत कॉन्फरन्सच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने केली. आंदोलनाचे केंद्र असलेल्या त्राल परिसर आणि श्रीनगरमध्ये निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी अश्रू धुराचा मारा केला. यात डझनावर लोक आणि दोन पोलीस जखमी झाले.

मसरतला ठोकल्या बेड्या
फुटीरतावाद्यांनी काश्मीरमध्ये पाकिस्तानी ध्वज हाती नाचवत पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्याबद्दल देशभरात तीव्र रोष व्यक्त होत असताना शुक्रवारी जम्मू-काश्मीर सरकारने फुटीरतावादी नेता मसरत आलम भटला शुक्रवारी पहाटे बेड्या ठोकल्या.
श्रीनगरमध्ये पाकिस्तानी ध्वज नाचवणे हा मोठ्या कटाचा भाग असून, मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांना लाभ पोहोचविण्याचाच त्यामागे हेतू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.