बंगळुरुत मुसळधार पावसानंतर "केमिकल" बर्फवृष्टी

By Admin | Published: May 29, 2017 01:05 PM2017-05-29T13:05:58+5:302017-05-29T13:25:35+5:30

तलाव फेसाळल्यामुळे शहरातील रस्त्यांवर जणू काही बर्फवृष्टीच होत आहे असं चित्र पाहायला मिळत आहे

After the heavy rains in Bangalore, "Chemical" snowfall | बंगळुरुत मुसळधार पावसानंतर "केमिकल" बर्फवृष्टी

बंगळुरुत मुसळधार पावसानंतर "केमिकल" बर्फवृष्टी

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 29 - शहरात वाढलेल्या तापमानात मान्सूनपुर्व पावसामुळे घट झाल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला. मात्र या पावसाने एकीकडे दिलासा दिला असताना तलावाशेजारी राहणा-यांच्या समस्या मात्र वाढवल्या आहेत. शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बर्फवृष्टी होऊ लागली आहे. मात्र ही बर्फवृष्टी केमिकल आहे. पावसामुळे तलावात फेस झाला असून संपुर्ण रस्त्यावर तो पसरत आहे. जवळच राहणा-यांना तर आपण ढगात असल्यासारखं वाटत असावं इतका फेस या तलावातून निघत आहे. रस्त्यावरुन जाणा-या गाड्यांनाही या फेसामुळे त्रास होत असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
 
तलाव फेसाळल्यामुळे शहरातील रस्त्यांवर जणू काही बर्फवृष्टीच होत आहे असं चित्र पाहयला मिळत आहे. मात्र ही बर्फवृष्टी दूषित रसायनांमुळे तयार झालेल्या फेसाने होत असल्याने स्थानिक चिंतेत आहेत. हा फेस बंगळुरुतील रस्त्यांवर पसरला आहे. मुसळधार पावसानंतर बंगळुरुतील रस्त्यांवर दूषित रासायनिक फेसाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. 
 
"शनिवारी सकाळी ही गोष्ट आमच्या लक्षात आली. सुरुवातीला हा फेस फक्त तलावात दिसत होता. पण नंतर आलेल्या जोरदार वा-यामुळे हा फेस रस्त्यावर आला असून वाहतुकीची समस्या निर्माण झाली. दुचाकी वाहनचालकांनाही त्रास होत असून हा फेस हेल्मेटमधून आता जात असल्याचं", स्थानिकाने सांगितलं आहे. हा फेस जवळच्या मॉल आणि रुग्णालयातही पोहोचला असल्याचं स्थानिक सांगत आहेत. 
 
रस्त्यावर फेस पसरलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोकांनी या परिस्थितीला महापालिका जबाबदार असल्याचं सांगत लवकराच लवकर उपाय करावा अशी मागणी केली आहे. 
 

Web Title: After the heavy rains in Bangalore, "Chemical" snowfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.