रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 10:47 AM2024-11-28T10:47:44+5:302024-11-28T10:49:35+5:30

Train Blanket Wash: रेल्वेतून प्रवास करताना चादर, ब्लँकेट दिले जातात. पण, ते धुतले जातात का? किती दिवसांनी धुतले जातात? असे प्रश्न वारंवार चर्चेत येतात. 

After how many days are the sheets and blankets washed in the railways, what did the railway minister answer? | रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?

रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?

Train Blanket News: रेल्वेने एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चादर, ब्लँकेट दिले जातात. पण, रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना एक प्रश्न असतो की, रेल्वेकडून पुरवले जाणाऱ्या चादरी, ब्लँकेट धुतल्या जातात का? किती दिवसांनी धुतल्या जातात? याबद्दलच रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांना विचारण्यात आले. रेल्वे मंत्र्यांनी यावर उत्तर दिले.  

काँग्रेसचे गंगानगरचे खासदार कुलदीप इंदौरा यांनी रेल्वेतील साफसफाई आणि चादरी, ब्लँकेट धुतल्या जातात का याबद्दल रेल्वे मंत्रीअश्विनी वैष्णव यांना प्रश्न विचारले होते. प्रवाशांनी मुलभूत स्वच्छता ठेवण्यासाठी पैसे देतात, मग  चादरी वा ब्लँकेट महिन्यात केवळ एकदाच धुतले जातात का? असे इंदौरा यानी विचारले होते. 

त्याला उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, "रेल्वे प्रवाशांना दिली जाणारी चादर, ब्लँकेट महिन्यातून कमीत कमी एकवेळा धुतले जातात. आणि चादरीला जोडण्यासाठी आणखी एक पांघरून अतिरिक्त दिले जाते.

सध्या भारतीय रेल्वेमध्ये वापरले जाणाऱ्या चादरी हलक्या आणि धुण्यासाठी सोप्या असतात. त्यामुळे प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळतो, असे उत्तर रेल्वे मंत्र्यांनी दिले. 

नवीन चादरींसाठी बीएसआय स्टॅण्डर्डही वाढवण्यात आले आहे. चादरी धुण्यासाठी मशीन आणि लिक्विड यांच्या गुणवत्तेचा प्रमाण निर्धारित करण्यात आले आहे. त्याचबरोबर यासंबंधातील तक्रारींसाठी रेलमदत पोर्टल अपडेट करण्यात आले आहे. 

Web Title: After how many days are the sheets and blankets washed in the railways, what did the railway minister answer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.