भारताच्या पराभवानंतर काश्मिरात फुटले फटाके

By admin | Published: June 19, 2017 11:09 AM2017-06-19T11:09:10+5:302017-06-19T11:27:44+5:30

काल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला दारुण पराभव पत्करावा लागल्याने देशभरात दु:ख आणि निराशेचे वातावरण आहे. मात्र भारतीय संघाच्या

After India's defeat, bursting crackers in Kashmir | भारताच्या पराभवानंतर काश्मिरात फुटले फटाके

भारताच्या पराभवानंतर काश्मिरात फुटले फटाके

Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 19 - काल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला दारुण पराभव पत्करावा लागल्याने देशभरात दु:ख आणि निराशेचे वातावरण आहे. मात्र भारतीय संघाच्या पराभवाने काश्मीरमधील फुटिरतावाद्यांना आपल्या भारतद्वेशाला मोकळी वाट करून देण्याची संधी मिळाली. चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचा विजय झाल्यावर फुटिरतावाद्यांनी फटाके फोडून जल्लोश केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत., त्यांनी भारतविरोधी घोषणाही दिल्या. 
श्रीनगरमध्ये तरुणांनी फटाके फोडून पाकिस्तानचे झेंडे फडकवून आनंद साजरा केला. भारतविरोधी घोषणाबाजीही केली. श्रीनगरमधील फतेहकदाल, साकीदफर आणि अनंतनाग येथे पोलिस आणि लष्कराच्या तळांवर फटाके फेकणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. 
त्रालमध्ये सुद्धा पाकिस्तानच्या विजयानंतर महिला आणि पुरुषांनी रस्त्यावर उतरून पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोश साजरा केला. त्रालमधील प्रत्येक गावात विजयानिमित्त मिरवणुका निघाल्याचेही वृत्त आहे. शोपियाँ  आणि कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे समजते. पण याला दुजोरा मिळू शकलेला नाही.  
( विराटसेनेला फाजील आत्मविश्वास नडला! )
 
काल झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत फखर झमानच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ४ बाद ३३८ धावांची दमदार मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताचा डाव ३०.३ षटकांत १५८ धावांत गुंडाळला. भारतीय डावात हार्दिक पांड्याचा (७६ धावा, ४३ चेंडू, ४ चौकार, ६ षट्कार) अपवाद वगळता अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली.
( भारताच्या पराभवाची आणि पाकिस्तानच्या विजयाची ही आहेत कारणे )
 

Web Title: After India's defeat, bursting crackers in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.