पतीची हत्या करून टॉयलेटमध्ये पुरला मृतदेह, अखेर अनेक दिवसांनंतर असं फुटलं बिंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 09:51 AM2024-08-29T09:51:23+5:302024-08-29T09:52:05+5:30

Rajasthan Crime News: राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील सनसनाटी घटना समोर आली आहे. येथील गोगामेडीमधील खचवानामध्ये पत्नीने तिच्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातील टॉयलेटमध्ये पुरल्याचं उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

After killing her husband, the body was buried in the toilet  | पतीची हत्या करून टॉयलेटमध्ये पुरला मृतदेह, अखेर अनेक दिवसांनंतर असं फुटलं बिंग 

पतीची हत्या करून टॉयलेटमध्ये पुरला मृतदेह, अखेर अनेक दिवसांनंतर असं फुटलं बिंग 

राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील सनसनाटी घटना समोर आली आहे. येथील गोगामेडीमधील खचवानामध्ये पत्नीने तिच्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातील टॉयलेटमध्ये पुरल्याचं उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले तसेच त्यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन तपासाला सुरुवात केली.  

मिळालेल्या माहितीनुसार खचवाना गावातील रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय रूपराम हा १६ दिवसांपासून राहत्या घरातून बेपत्ता झाला होता. त्याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये याची तक्रारही केली होती. मात्र सुरुवातीला पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यानंतर या नातेवाईकांनी स्थानिक आमदाराकडे धाव घेत गाऱ्हाणं मांडलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. पोलिसांनी तपासादरम्यान, रूप राम याच्या पत्नीची कसून चौकशी केली. तसेच तिला पोलिसी खाक्या दाखवला. तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. तसेच तिने गुन्हा कबूल केला. 

पोलिसांनी रूपराम याच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या शंकेनंतर घरातील टॉयलेट खोदून पाहिलं. तेव्हा त्यांना रूपराम याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ताब्यात घेतला. तसेच पोस्टमार्टेमसाठी पाठवला. यादरम्यान, एफएसएल पथकाने पुरावे गोळा केले. दरम्यान, रूपराम याच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार अनेकदा पोलिसांसमोर विनंती करीनही त्यांनी घटनेची दखल घेतली नाही. रूपराम याची हत्या त्याची पत्नीच करू शकते, अशी शंकाही नातेवाईकांनी व्यक्त केली होती. मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नव्हती.  

Web Title: After killing her husband, the body was buried in the toilet 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.