31 वर्षाच्या मुलाला गमावलं; 64 व्या वर्षी पुन्हा दिला मुलाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 09:04 AM2017-08-02T09:04:44+5:302017-08-02T09:41:47+5:30

दिल्लीतील एका महिलेने वयाच्या 64 व्या वर्षी एका गोडंस आणि सुदृढ बाळाला जन्म दिला आहे.

After losing 31-year-old son, woman delivers baby boy at 64 | 31 वर्षाच्या मुलाला गमावलं; 64 व्या वर्षी पुन्हा दिला मुलाला जन्म

31 वर्षाच्या मुलाला गमावलं; 64 व्या वर्षी पुन्हा दिला मुलाला जन्म

Next
ठळक मुद्देआईने वयाच्या 64 व्या वर्षी एका गोडंस आणि सुदृढ बाळाला जन्म दिला आहे.आईने वयाच्या 64 व्या वर्षी एका गोडंस आणि सुदृढ बाळाला जन्म दिला आहे.वयाच्या साठीत आमच्या मुलाचं संगोपन करायला आम्ही सुदृढ असणं गरजेच आहे, म्हणूनच प्रत्येक सहा महिन्यातून आम्ही नियमीत वैद्यकिय तपासणी करत असल्याचं जगदिश मीना यांनी सांगितलं

नवी दिल्ली, दि. 2-  दिल्लीत राहणाऱ्या एका महिलेने वयाच्या 64 व्या वर्षी बाळाला जन्म दिला आहे. पोटच्या मुलाचं त्याच्या वयाच्या 31 वा व्या वर्षी निधन झाल्यानंतर एकटी पडलेल्या आईने वयाच्या 64 व्या वर्षी एका गोडंस आणि सुदृढ बाळाला जन्म दिला आहे. चमेली मीना असं या महिलेचं नाव आहे. दिल्लीत राहणाऱ्या मीना या जोडप्याने 'इन विट्रो फर्टीलायजेशन'च्या सहाय्याने बाळाला जन्म दिला. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. अरमान असं त्या मुलाचं नाव ठेवलं आहे. चमेली मीना यांचे पती 65 वर्षीय जगदिश मीना 2012 मध्ये एका बड्या सरकारी कंपनीतून सेवानिवृत्त झाले.

वयाच्या साठीत आमच्या मुलाचं संगोपन करायला आम्ही सुदृढ असणं गरजेच आहे, म्हणूनच प्रत्येक सहा महिन्यातून आम्ही नियमीत वैद्यकिय तपासणी करत असल्याचं जगदिश मीना यांनी सांगितलं.
 'इन विट्रो फर्टीलायजेशन'च्या मदतीने मुलाला जन्म देणारं मीना हेच कुटुंब नाहीये तर गेल्या पाच वर्षात पन्नासपेक्षा जास्त वय असलेल्या 20 ते 25 महिलांनी 'इन विट्रो फर्टीलायसेशन'द्वारे बाळाला जन्म दिल्याचं,दिल्ली आयव्हीएफचे अध्यक्ष डॉ.अनूप गुप्ता यांनी सांगितलं आहे. जर ती महिला शारीरीकदृष्ट्या सुदृढ असेल आणि या ट्रिटमेंटमधून सहजासहजी जाऊ शकेल, तर अशांना आम्ही कसं नाही म्हणणार? तसंच आयव्हीएफची प्रोसिजर सुरू करण्याआधी आम्ही त्या जोडप्याची आर्थिक परिस्थितीही तपासून पाहतो,असंही डॉ.अनूप गुप्ता यांनी सांगितलं आहे. 

आयव्हीएफ तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आपल्या मुलाला अपघातात किंवा इतर घटनेते गमावलेले पालकच वयाच्या पन्नाशीनंतर आयव्हीएफ प्रोसिडरचा वापर करतात. आम्ही एक असंही जोडपं पाहिलं आहे ज्यांनी नोकरीतून सेवानिवृत्त होइपर्यंत बाळाचा विचार केला नाही.पण सेवानिवृत्त झाल्यानंतर घरी एकटं वाटू लागल्याने त्यांनी आयव्हीएफची मदत घेतली.

गेल्या वर्षी एका पंजाबमधील 72 वर्षीय महिलेने हरियाणा नॅशनल फर्टिलिटी सेंटरमध्ये याच ट्रिटमेंटच्या माध्यमातून सुदृढ बाळाला जन्म दिला होता. आयव्हीएफच्या प्रत्येक केंद्रात 60 पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांनी आयव्हीएफद्वारे बाळाला जन्म दिल्याचा रेकॉर्ड आहे. पण बऱ्याचदा एका विशिष्ट वयापेक्षा जास्त वयाच्या जोडप्याला आयव्हीएफसाठी आम्ही नकार देत असल्याचंही मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. याच कारण म्हणजे जर वयाच्या पन्नाशीत एखाद्या जोडप्याने आयव्हीएफद्वारे बाळाला जन्म दिला तर ते मुलं 20 वर्षाचं होइपर्यंत त्याच्या आईवडिलांनी वयाची सत्तरी गाठली असते. या वयात मुलाचं संगोपन करण्याचं त्यांचं वय नसतं. म्हणून नकार द्यावा लागतो.
 

Web Title: After losing 31-year-old son, woman delivers baby boy at 64

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.