लग्नानंतर समजले पती तर भाऊ

By Admin | Published: September 16, 2015 11:28 AM2015-09-16T11:28:51+5:302015-09-16T11:28:51+5:30

एका लग्नात दोघांची भेट होते, दोघांचे सूत जुळते, घरचे विरोध करतील या भीतीपोटी दोघांनीही पळून जाऊन लग्नही केले.... पण मग तिला समजले पती हा चुलत भाऊ आहे.

After marriage, husband and brother understood | लग्नानंतर समजले पती तर भाऊ

लग्नानंतर समजले पती तर भाऊ

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि. १६ - एका लग्नात दोघांची भेट होते, दोघांचे सूत जुळते, घरचे विरोध करतील या भीतीपोटी दोघांनीही पळून जाऊन लग्नही केले.... पण मग तिला समजले पती हा चुलत भाऊ आहे. शेवटी नाईलाजास्तव घटस्फोटासाठी अर्ज केला व घटस्फोटाचे कारण वाचून सगळेच चक्रावून गेले.. एखाद्या चित्रपटातील कथानक शोभेल अशी ही घटना घडली आहे गुजरातच्या अहमदाबादमध्ये.

अहमदाबादमध्ये राहणा-या सुनीताची (नाव बदललेले) काही महिन्यांपूर्वी सामूहिक विवाह सोहळ्यात विजय (नाव बदललेले) ओळख झाली होती. हळहळू ओळखीचे रुपांतर प्रेमसंंबंधांमध्ये झाले व दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. घरच्यांपासून लपवून दोघानी लग्नही केले व सर्व सुरळित झाल्यावर घरी लग्नाचे सांगू असे त्यांनी ठरवले होते. पण लग्नाच्या काही दिवसांनी सुनीताला विजय हा चुलत भाऊ असल्याचे समजते. विजयलाही हा प्रकार समजल्यावर त्याने सुनीतासोबतचे सर्व संबंध तोडले व तिनेही विजयपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सुनिताला विजयशी घटस्फोट हवा असून सध्या हे प्रकरण स्थानिक महिला तक्रारण केंद्राकडे सोपवण्यात आले आहे. 

 

Web Title: After marriage, husband and brother understood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.