एअर फोर्स तर आहेच! पण, भारताच्या पायदळाचा सामना करणंही चीनला मुश्किल, मिळेल 'इट का जवाब पत्थर से'!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 04:50 PM2020-06-22T16:50:33+5:302020-06-22T17:03:37+5:30

आज भारताकडे संपूर्ण चीनमध्ये कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला चढवण्याचे सामर्थ्य आहे. याशिवाय, भारताने आपले पायदळही तेवढेच कनखर बनवले आहे. त्याचा सामना करणेही चीनला कठीण जाईल. चीनने तसा प्रयत्नही केला तर त्यांना 'इट का जवाब पत्थर से' मिळाल्या शिवाय राहणार नाही.

After the Mirage And Sukhoi Indian deployed brave mountain forces on the border | एअर फोर्स तर आहेच! पण, भारताच्या पायदळाचा सामना करणंही चीनला मुश्किल, मिळेल 'इट का जवाब पत्थर से'!

एअर फोर्स तर आहेच! पण, भारताच्या पायदळाचा सामना करणंही चीनला मुश्किल, मिळेल 'इट का जवाब पत्थर से'!

googlenewsNext
ठळक मुद्देभारताचे हे जवाना ड्रॅगनच्या पश्चिम, मध्य अथवा पूर्वेकडील कुठल्याही खेळीचे 'ईट का जवाब पत्थर'ने देऊ शकतात.या जवानांना खास गोरिला युद्धासाठी तयार करण्यात येते.आपण कारगिल युद्धाच्या वेळीही या जवानांचा पराक्रम पाहिला आहे.

 
नवी दिल्ली : गलवानमधील हिंसक चकमकीनंतर भारतचीनला घेरण्याची पूर्ण तयारी करत आहे. भारताने आपले शक्तीशाली, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सु-सज्ज आणि अचूक निशाणा असणारे, मिराज-2000 आणि सुखोई-30 सारखी लढाऊ विमानं, तसेच अपाचे आणि चिनूक सारखे हेलिकॉप्टर्स चीनच्या रोखानं एलएसीवर तैनात केली आहेत. आज भारताकडे संपूर्ण चीनमध्ये कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला चढवण्याचे सामर्थ्य आहे. याशिवाय, भारताने आपले पायदळही तेवढेच कनखर बनवले आहे. त्याचा सामना करणेही चीनला कठीण जाईल. चीनने तसा प्रयत्नही केला तर त्यांना 'इट का जवाब पत्थर से' मिळाल्या शिवाय राहणार नाही आणि गलवानमध्ये आपल्या जवानांनी हे सिद्धही केले आहे.

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

विविध माध्यमांत छापून आलेल्या वृत्तांनुसार, गलवानमध्ये चीनने दिलेल्या धोक्यानंतर, भारतीय जवानांनी सावध नसतानाही चीनचे जवळपास 40 जवान मारले. आता भारताने पेंगाँग त्सो सरोवरापासून ते गलवान खोऱ्यापर्यंत आपले खास जवान चीनी सैनिकांना टक्कर देण्यासाठी तैनात केले आहेत. या जवानांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले आहे. हे जवाना ड्रॅगनच्या पश्चिम, मध्य अथवा पूर्वेकडील कुठल्याही खेळीचे 'ईट का जवाब पत्थर'ने देऊ शकतात.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

भारताचे 'पहाडी योध्ये' -
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वरिष्ट स्थरावरील अधिकृत सूत्रांनी सांगितले, की चीनी सैनिकांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना चोख उत्तर देण्याचे आदेश भारतीय जवानांना देण्यात आले आहेत. बोलले जाते, की या जवानांना गेल्या दशकांत उत्तरेकडील फ्रंटवर लढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या जवानांना खास गोरिला युद्धासाठी तयार करण्यात येते. आपण कारगिल युद्धाच्या वेळीही या जवानांचा पराक्रम पाहिला आहे.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

'सर्वात खडतर लढाईसाठी दिले जाते प्रशिक्षण' -
एका माजी लष्कर प्रमुखांनी सांगितल्या प्रमाणे, पहाडांवरील लढाई सर्वात अवघड असते. उत्तराखंड, लडाख, गोरखा, अरुणाचल आणि सिक्किममध्ये या जवानांपूढे कुणाचाही टिकाव लागू शकत नाही.

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

पहाडांमध्ये भारताची आघाडी -
चीन संबंधातील एका तज्ज्ञाने म्हटले आहे, चीनच्या ताब्यात असलेली तिबेटमधील पठारे सपाट आहेत. तर भारतातील पठारे उंच आहेत. पहाडी भागांवर कबजा करणे जेवढे अवघड तेवढेच तो टिकवणेही अवघड असते.

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

भारत-चीन हवाई ताकद -
चीनकडे भारतात कोठेही डागले जाऊ शकतात, असे 104 न्युक्लिअर मिसाइल्स आहेत. मात्र, असे असले तरी आपल्याकडेही अग्नि 3 लॉन्चर सिस्टम आहे. जिच्या सहाय्याने भारतही संपूर्ण चीनमध्ये कोणत्याही कोपऱ्यात हल्ला चढवू शकतो. एवढेच नाही, तर भारताकडे अन्विक क्षमता असलेली 51 विमानं आहेत. जे ग्रॅव्हिटी बॉम्बने सुसज्ज आहेत. या शिवायही भारताची  हवाई ताकद फार मोठी आहे. 

 

Web Title: After the Mirage And Sukhoi Indian deployed brave mountain forces on the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.