इस्रो मिशन मोडमध्ये; चांद्रयान 2 नंतर सूर्य, शुक्राकडे भरारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 05:26 PM2019-06-13T17:26:54+5:302019-06-13T18:00:10+5:30
15 जूनला चांद्रयान 2 झेपावणार
नवी दिल्ली: चंद्रयान 1 मोहीम यशस्वी झाल्यानंतर चांद्रयान 2 यशस्वी करण्यासाठी इस्रोची यंत्रणा सज्ज झाली आहे. यानंतर इस्रो सूर्य आणि शुक्रच्या दिशेनं उड्डाण करणार आहे. चांद्रयान 2 मोहिमेच्या तयारीची माहिती देताना केंद्र सरकार आणि इस्रोनं आगामी योजनांबद्दल भाष्य केलं. मिशन चांद्रयानसाठी 10000 कोटींचा खर्च येणार आहे.
On the eve of 75th Independence anniversary of India in 2022 @isro has resolved to send its first human Mission into space. An exclusive special cell has been created, #Gaganyaan National advisory council to monitor planning, preparation of Mission: Union Min. @DrJitendraSinghpic.twitter.com/jMa9UDg4Ev
— PIB India (@PIB_India) June 13, 2019
केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी आज चांद्रयान 2 सह आगामी काळातील योजनांची माहिती दिली. गेल्या काही वर्षांपासून अंतराळ क्षेत्रात भारतानं महत्त्वपूर्ण मोहिमा पूर्ण केल्या असून येत्या काळात सूर्य आणि शुक्र हे इस्रोचं लक्ष्य असेल, असं सिंह यांनी सांगितलं. 'चांद्रयान-2 शनिवारी (15 जून) अवकाशात झेपावेल. या मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारतातच प्रशिक्षण देण्यात आलं आहे,' अशी माहिती इस्रोच्या प्रमुखांनी दिली.
Union Minister of State for Atomic Energy and Space, Dr Jitendra Singh: Chandrayaan-2 to be launched on July 15, 2019 tentatively, it will land in September, it will carry a rover. It will be an extension of Chandrayaan-1. pic.twitter.com/07CNlS6YhG
— ANI (@ANI) June 13, 2019
15 जूनला अंतराळात झेपावणारं चंद्रयान-2 म्हणजे चांद्रयान-1 मोहिमेचा पुढचा टप्पा असेल, असं जितेंद्र सिंह म्हणाले. इस्रोचं पुढील लक्ष्य सूर्य असेल. यासाठी मिशन सन राबवण्यात येईल, अशी माहिती के. सिवन यांनी दिली. सूर्य आणि पृथ्वीच्या मधोमध एक उपग्रह पाठवण्याची आमची योजना आहे. अंतराळ क्षेत्रात सर्वात आघाडीवर असलेला देश होण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. गगनयान मोहीम 2021 पर्यंत पूर्ण होईल. यानंतर 2023 मध्ये शुक्र मोहिमेची योजना आखण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. जागतिक तापमानवाढीच्या समस्येवरदेखील काम सुरू असल्याचं ते म्हणाले.