मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या नेत्याचे घृणास्पद ट्वीट, भारतीयांनी केले #BoycottMaldives
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 11:18 AM2024-01-07T11:18:35+5:302024-01-07T11:18:52+5:30
मालदीवच्या सत्तारुढ पक्षाच्या नेत्याने भारतीयांवरून घाणेरडी कमेंट केली आहे. प्रोग्रेसिव्ह पक्षाचे नेते जाहिद रमीज यांनी भारतीयांची खिल्ली उडविली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी पर्यटनाचा आनंद घेतला होता. तेव्हापासून लक्षद्वीप जगभरात ट्रेंड करत होता. ही गोष्टी भारतव्देष्ट्या मालदीव सरकारला खटकली आहे. सुंतरतेत लक्षद्वीप मालदीवला टक्कर देत असल्याने तसेच कमी खर्चात भारतातच आनंद मिळत असल्याने भारतीय मालदीवला न जाता लक्षद्वीपला जायचे बोलू लागले आहेत. यावरून मालदीवच्या लोकांनी भारताविरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. यावरून भारतीयांनीही बॉयकॉट मालदीव असे ट्रेंड केले आहे.
मालदीवच्या सत्तारुढ पक्षाच्या नेत्याने भारतीयांवरून घाणेरडी कमेंट केली आहे. प्रोग्रेसिव्ह पक्षाचे नेते जाहिद रमीज यांनी भारतीयांची खिल्ली उडविली आहे. त्यांनी ट्वीट केल्यानंतर मालदीवच्या ट्रोल आर्मीनेदेखील ट्वीट करण्यास सुरुवात केली. यामुळे चिडलेल्या भारतीयांनीही मालदीववर हल्ला सुरु केला. यानंतर मालदीववर बहिष्कार घालण्याचा ट्रेंड सुरु झाला.
तेथील नेता जाहिद रमीझ याने पीएम मोदींच्या मालदीव भेटीचा व्हिडिओ रिट्विट केला आहे. 'चांगले पाऊल. मात्र, आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक आहे. आम्ही देत असलेली सेवा ते कशी देऊ शकतात? ते इतके स्वच्छ कसे असू शकतात? सर्वात मोठी समस्या खोल्यांमधील वास असेल, असे रमीझ याने म्हटले आहे.
मालदीवच्या नेत्यांच्या अशा घृणास्पद ट्विटवरून हे स्पष्ट झाले आहे की पीएम मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या पर्यटनाला नक्कीच मोठा फटका बसणार आहे. जाहिद रमीझच्या या कमेंटला लोकही कडाडून विरोध करत आहेत.
भारत नेहमीच मालदीवला मदत करत आला आहे. लाखो रुपये खर्च करून फक्त भारतीयच सुट्ट्यांसाठी मालदीवला जातात. या देशाची अर्थव्यवस्था अशीच चालते. लोकांना रोजगार मिळतो. असे असूनही मालदीव भारताविरुद्ध विष ओकत आहे. नवे राष्ट्रपती मोहम्मद मोईझू यांची भारतावर वाकडी नजर आहे. निवडून येताच त्यांनी आधी तुर्कीचा दौरा केला, आता चीनला जाणार आहेत.