सासू जावयानंतर आता बिर्याणीवाला...; कामावर ठेवलेला पोरगाच मालकाच्या पत्नीला पळवून घेऊन गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 14:12 IST2025-04-18T14:11:41+5:302025-04-18T14:12:04+5:30
बिर्याणीवाल्याकडे कामाला असलेल्या तरुणाने मालकाच्याच पत्नीला पळवून नेल्याची घटना घडली आहे.

सासू जावयानंतर आता बिर्याणीवाला...; कामावर ठेवलेला पोरगाच मालकाच्या पत्नीला पळवून घेऊन गेला
नुकतीच सासू आणि होणाऱ्या जावयाचा पळून जाण्याची घटना प्रचंड व्हायरल झाली होती. या दोघांना नेपाळच्या सीमेवरून ताब्यात घेण्यात आले असताना आता बिर्याणीवाल्यासोबत अशीच घटना घडली आहे. बिर्याणीवाल्याकडे कामाला असलेल्या तरुणाने मालकाच्याच पत्नीला पळवून नेल्याची घटना घडली आहे.
ग्रेटर नोएडामध्ये बिर्याणीचा स्टॉल होता, त्याच्या मालकाने एका तरुणाला तिथे कामाला ठेवले होते. त्याची रहायची व्यवस्था देखील त्याने आपल्याच घरात केली होती. या तरुणाने मालकाच्याच पत्नीसोबत प्रेमसंबंध जुळविले. हे तिघेच या घरात राहत होते. तरुणाने मालकाच्या पत्नीला पळवून नेले, यामुळे मालकाला धक्का बसला होता.
तो कामगार तरुण आणि मालकाची पत्नी तीन दिवस एकत्र राहिले होते. तीन दिवस राहुन झाल्यानंतर तरुण मालकाच्या पत्नीला तिच्या घरी सोडायला आला. तेव्हा मालकाने त्यांना पकडले आणि चांगले धु-धु धुतले. मालकाचा मार खाल्ल्यानंतर आता हा तरुण दिल्लीच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांनी बिर्याणी स्टॉल मालक आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
१ एप्रिल रोजी काम करणारा तरुण त्याच्या मालकाच्या पत्नीसोबत घरातून पळून गेला होता. तिघेही एकाच घरात भाड्याने राहत होते. १५ एप्रिलला त्याला पत्नीला घरी सोडताना पकडले. मालकाने व त्याच्या वडिलांनी त्याला दांड्याने मारहाण केली. यात त्या तरुणाला गंभीर दुखापत झाली. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला दिल्ली रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.