पासपोर्ट व्हेरीफिकेशन केल्यानंतर पोलीस 'तिला' म्हणाला, लग जा गले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 06:55 PM2018-07-13T18:55:37+5:302018-07-13T18:56:18+5:30
महिलेने आपला पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी पोलिस अधिकाऱ्याकडे दिला होता. त्यावेळी, पोलिस अधिकाऱ्याने पासपोर्टचे व्हेरीफिकेशन केल्यानंतर महिला पत्रकारास गळाभेट करण्याची मागणी केली.
गाझियाबाद - उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका पोलिस अधिकाऱ्याने महिला पत्रकाराशी गैरवर्तणूक केली आहे. गाझियाबाद जिल्ह्याच्या इंदिरापुरम ठाणे परिसरातील सेक्टर तीनमध्ये ही महिला पत्रकार राहते. या महिलेने आपला पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी पोलिस अधिकाऱ्याकडे दिला होता. त्यावेळी, पोलिस अधिकाऱ्याने पासपोर्टचे व्हेरीफिकेशन केल्यानंतर महिला पत्रकारास गळाभेट करण्याची मागणी केली. याप्रकरणी महिलने टविटवरुन गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
पत्रकार महिलेने गाझियाबाद पोलिसाच्या या वर्तणुकीबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, विदेशमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यानंतर गाझियाबादच्या एसएसपींनी कारवाई करत संबंधित पोलिस अधिकाऱ्यास निलंबित केले असून तपासाचे आदेश दिले आहेत. तसेच याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसात येऊन तक्रार दाखल करावी, अशी सूचनाही केली आहे. या महिलेचा पासपोर्ट रिन्यूअल करण्यात येत होता. देवेंद्रसिंह असे या नव्यानेच भरती झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून गुरुवारी दुपारी 12.30 वाजता महिला पत्रकाराच्या घरी पासपोर्ट व्हिरिफिकेशनसाठी ते गेले होते. पासपार्टचे व्हेरीफिकेशन झाल्यानंतर पोलिस अधिकारी ठाण्यात परतले. मात्र, संबंधित महिलेने व्हॉट्सअॅपद्वारे या पोलिस अधिकाऱ्याने गळाभेट करण्याची मागणी केल्याची तक्रार केली. तसेच ट्विटरवरुनही संबंधित विभागातील मंत्र्यांना याबाबत कारवाई करण्याची विनंती केल्याचे एसएसपी रवि कुमार यांनी सांगितले.