PM मोदींनंतर बाबा रामदेव यांची 'मादाम तुसाँ म्यूझियम'मध्ये एंट्री; ओळखा - कोणते खरे? कोणते खोटे?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 02:29 PM2024-01-30T14:29:47+5:302024-01-30T14:32:12+5:30
यापूर्वी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा मेनाचा पुतळाही या म्यूझियममध्ये उभा करण्यात आला आहे.
न्यूयॉर्क येथील मादाम तुसाँ म्यूझियममध्ये योग गुरू बाबा रामदेव यांचा मेनाचा पुतळा उभा करण्यात येणार आहे. मंगळवारी दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात खुद्द योगगुरू बाबा रामदेव यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. यावेळी पतंजली योगपीठचे सह संस्थापक आचार्य बालकृष्ण आणि पतंजली योगपीठ (यूके) ट्रस्टच्या संस्थापक ट्रस्टी सुनीता पोद्दार हे उपस्थित होते. यापूर्वी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा मेनाचा पुतळाही या म्यूझियममध्ये उभा करण्यात आला आहे.
पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर, बाबा रामदेव यांनी पुतळ्याच्या कपाळावर गंध लावले आणि हुबेहूल पुतळ्याप्रमाणे पेझही दिली. बाब रामदेव यांनी दिलेली पोझ एवढी हुबेहूब होती की, खरे बाबा रामदेव कोण? असा प्रश्न पडावा! या समारंभानंतर आता ती न्यूयॉर्कला पाठवण्यात येणार आहे. ततेपूर्वी, हा भारतीय संस्कृती, संन्यास आणि सनातन योग परंपरेसाठी जागतिक प्रतिष्ठेचा ऐतिहासिक क्षण आहे. असे पतंजली योगपीठाचे केंद्रीय प्रवक्ते एसके तिजारावाला यांनी म्हटले आहे.
#WATCH | Wax figure of Yog Guru Ramdev unveiled at an event of ‘Madame Tussauds New York’ in Delhi. pic.twitter.com/xFmsUyKWHm
— ANI (@ANI) January 30, 2024
बाबा रामदेव पहिले भारतीय संन्यासी -
पतंजलीने केलेल्या दाव्यानुसार, योग गुरु बाबा रामदेव हे मादाम तुसाँ म्यूझियममध्ये जगा मिळवणारे पहिले भारतीय संन्यासी आहेत. हा भारतीय संस्कृती, संन्यास आणि प्रामुख्याने सनातन योग परंपरेच्या वैश्विक प्रभावाच्या मान्यतेचा आणि देशाचा सन्मान आहे.