PM मोदींच्या आवाहनानंतर BCCI, BJP नेत्यांनी बदलला 'X' वरचा DP; तिरंगी ध्वजाचा फोटो लावताच गायब झालं ब्लू टिक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 12:05 PM2023-08-14T12:05:44+5:302023-08-14T12:07:03+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (13 ऑगस्ट) देशवासियांना सोशल मिडियावरील डीपी बदलून 'हर घर तिरंगा' अभियानाला समर्थन देण्याचे आवाहन केले होते.
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून (आधीचे ट्विटर) भाजपच्या चार मोठ्या नेत्यांचे व्हेरिफिकेशन टिक अथवा ब्ल्यू टिक गायब झाले आहेत. यात योगी आदित्यनाथ, शिवराज सिंह चौहान आणि मनोहर लाल खट्टर यांचा समावेश आहे. या सर्वांनी 15 ऑगस्ट निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी केलेल्या आवाहनानंतर, आपल्या डीपीवर तिरंगी ध्वजाचा फोटो लावला होता. मात्र तिरंगी ध्वजाचा फोटो लावताच त्यांच्या अकाउंटवरून व्हेरिफिकेशन टिक गायब झाले.
बीसीसीआयचेही ब्ल्यू टिक गायब -
या शिवाय, बीसीसीआयचेही ब्ल्यू टिक गायब झाले आहे. पंतप्रधान मोदींनी जनतेला आवाहन करत स्वतःही आपला डीपी बदलला होता. यानंतर बीसीसीआयनेही त्यांचे अनुकरण केले आणि याच वेळी त्यांचे ब्लू टिक गायब झाले. मात्र लवकरच बीसीसीआयला एक्सवर (ट्विटर) पुन्हा ब्लू टिक मिळून जाईल. यासाठी कुठल्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (13 ऑगस्ट) देशवासियांना सोशल मिडियावरील डीपी बदलून 'हर घर तिरंगा' अभियानाला समर्थन देण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदींनी रविवारी आपल्या 'एक्स' अकाउंटवरून, 'हर घर तिरंगा आंदोलनाच्या भावनेने, या अपण सोशल मिडिया अकाउंटचा डीपी बदलूया आणि देशासोबतचे आपले नाते आणखी घट्ट आणि धृड बनवण्याच्या दिशेने आपला सहयोग देऊयात,' असे आवाहन केले होते.
In the spirit of the #HarGharTiranga movement, let us change the DP of our social media accounts and extend support to this unique effort which will deepen the bond between our beloved country and us.
— Narendra Modi (@narendramodi) August 13, 2023