पूजा खेडकरनंतर आणखी ६ अधिकारी अडचणीत येणार; डीओपीटीने वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी सुरू केली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 03:49 PM2024-08-02T15:49:17+5:302024-08-02T15:55:53+5:30

युपीएससीने पूजा खेडकर विरोधात मोठी कारवाई केली. खेडकरची नियुक्ती रद्द केली असून यापुढे कोणतीही युपीएससीची परीक्षा देता येणार आहे.

After Pooja Khedkar, 6 more officers will be in trouble DOPT started checking medical certificates | पूजा खेडकरनंतर आणखी ६ अधिकारी अडचणीत येणार; डीओपीटीने वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी सुरू केली

पूजा खेडकरनंतर आणखी ६ अधिकारी अडचणीत येणार; डीओपीटीने वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी सुरू केली

पुण्यातील पूजा खेडकर विरोधात युपीएससीने दोन दिवसापूर्वी मोठी कारवाई केली. खेडकरने खोट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आता आणखी ६ अधिकारी अडचणीत आले आहेत. पूजा खेडकरचे प्रकरण समोर आल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DOPT)ने अन्य सहा अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी सुरू केली आहे.

ज्या अधिकाऱ्यांची प्रमाणपत्रे तपासण्यात आली आहेत, त्यांची नावे आणि प्रमाणपत्रे गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर शेअर केली जात होती. सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, काही परिवीक्षाधीन आणि काही सेवारत अधिकाऱ्यांची अपंगत्व प्रमाणपत्रे आता छाननीखाली आली आहेत.

औरंगाबाद-उस्मानाबादची नावे बदलणार, सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात फेटाळली

पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीच्या आरोपानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगने प्रशिक्षणार्थी आयएएसची नियुक्ती रद्द केली आहे. UPSC ने फक्त तिची उमेदवारीच रद्द केली नाही, तर खेडकरला भविष्यात कोणत्याही परीक्षेत किंवा निवडीला बसण्यास परवानगी नाकारली आहे.

पूजाने तिच्या आई-वडिलांचे नाव बदलले होते

यूपीएससीने म्हटले आहे की, पूजा खेडकरने नागरी सेवा परीक्षेच्या म्हणजेच CSE-2022 च्या नियमांचे उल्लंघन केले आहे, असं उपलब्ध कागदपत्रांच्या प्राथमिक तपासणीवरून हे स्पष्ट झाले आहे.

युपीएससीने १८ जुलै रोजी पूजा खेडकरला या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस दिली आहे. नावे बदलून युपीएससीच्या परीक्षा कशा दिल्या? असं यात विचारण्यात आले होते. पूजाने ४ ऑगस्टपर्यंत वेळ मागितली असली तरी तिला उत्तर देण्यासाठी २५ जुलैपर्यंत वेळ देण्यात आला होता. यावर युपीएससीने तिला ३० जुलै रोजी दुपारी ३.३० पर्यंत वेळ दिला होता, पण त्यांनी आपली बाजू मांडलेली नाही. यामुळे युपीएससीने तिची नियुक्ती रद्द केली. 

Web Title: After Pooja Khedkar, 6 more officers will be in trouble DOPT started checking medical certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.