पूजा खेडकरनंतर काही अधिकाऱ्यांचेही अनेक कारनामे व्हायरल ; अपंग कोट्यातून यूपीएससीमध्ये निवड, आता व्यायाम अन् डान्स व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 08:18 AM2024-07-16T08:18:12+5:302024-07-16T08:18:38+5:30
दृष्टिहीन असताना काहींनी दिली ड्रायव्हिंग टेस्ट
नवी दिल्ली : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरनंतर देशातील काही अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. काही जणांनी दृष्टीदोष असल्याचे सांगितले तर काहींनी लोकोमोटिव्ह डिसऑर्डर असल्याचे सर्टिफिकेट दाखल केले. काहींनी ईडब्ल्यूएस कोट्यातून नोकरी मिळवली. ही नावे आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहेत.
अभिषेक सिंग
बॅच : २०११, कोटा : अपंग (लोकोमोटिव्ह डिसऑर्डर),
आरोप :अभिषेक यांनी अपंग कोट्यातून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांनी स्वत:ला लोकोमोटिव्ह डिसऑर्डर म्हणजेच चालण्यास असमर्थ असल्याचे म्हटले होते. अभिनयात करिअर करण्यासाठी अभिषेकने आयएएस पदाचा राजीनामा दिला होता, असे असताना सध्या अभिषेकचे जिम वर्कआउट आणि डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
आसिफ के. युसूफ (आयएएस)
बॅच : २०२० कोटा : ईडब्ल्यूएस
आरोप : बनावट ओबीसी एनसीएल प्रमाणपत्र वापरून तो आयएएस अधिकारी
बनला आणि २०२० मध्ये सर्व तपासाअंती त्याने बनावट प्रमाणपत्र वापरून
आयएएस पद मिळवल्याचे सिद्ध झाले आहे.
प्रियांहू खाती (आयएएस)
बॅच : २०२१
कोटा : सामान्य (ऑर्थोपेडिकली अपंग)
आरोप : त्यांची ओएच (ऑर्थोपेडिकली अपंग) श्रेणी अंतर्गत भरती करण्यात आली होती. मात्र अनेकांनी ते पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचा दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर तशा अनेक पोस्ट केल्या आहेत.
अनू बेनिवाल (आयपीएस)
कोटा : ईडब्ल्यूएस
आरोप : अनु यांचे वडीलदेखील आयपीएस अधिकारी होते आणि त्यांची स्वतः ईडब्ल्यूएस कोट्यातून निवड झाली आहे. एका आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी असूनही ईडब्ल्यूएस कोट्यातून निवड झालीच कशी असा प्रश्न विचारला जात आहे.
निकिता खंडेलवाल (आयएएस)
बॅच : २०१४
कोटा : सामान्य (दृष्टिहीन)
आरोप : दृष्टिहीन कोट्यांतर्गत निकिता यांची सामान्य श्रेणीतून निवड झाली. मात्र, चष्मा न लावता त्या कशा ड्रायव्हिंग टेस्ट देत आहे, हे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.