आयुक्तांच्या झाडाझडतीनंतर पावसाळी कामांना वेग
By admin | Published: June 8, 2016 01:50 AM2016-06-08T01:50:41+5:302016-06-08T01:50:41+5:30
पुणे : मान्सूनचे आगमन होण्यास दोन दिवसांचा कालावधी उरला असतानाही अद्याप पावसाळी कामे पूर्ण न झाल्याने महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी क्षेत्रिय कार्यालयातील अधिकार्यांची झाडाझडती घेतल्यानंतर अखेर पावसाळी कामे पूर्ण करण्यास वेग आला आहे. येत्या ३ दिवसात ही सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश कुणाल कुमार यांनी काढले आहेत. यापार्श्वभुमीवर शहराच्या अनेक भागांमध्ये नाले, पावसाळी गटारे यांच्या सफाईची कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे.
Next
प णे : मान्सूनचे आगमन होण्यास दोन दिवसांचा कालावधी उरला असतानाही अद्याप पावसाळी कामे पूर्ण न झाल्याने महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी क्षेत्रिय कार्यालयातील अधिकार्यांची झाडाझडती घेतल्यानंतर अखेर पावसाळी कामे पूर्ण करण्यास वेग आला आहे. येत्या ३ दिवसात ही सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश कुणाल कुमार यांनी काढले आहेत. यापार्श्वभुमीवर शहराच्या अनेक भागांमध्ये नाले, पावसाळी गटारे यांच्या सफाईची कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे.प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाने केलेल्या नालेसफाईच्या कामाची तपासणी करण्यासाठी कुणाल कुमार यांनी मुख्य खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांची नियुक्ती करून त्यांना त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दरवर्षी नाले, पावसाळी गटारे सफाईची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन दिली जाते, मात्र ही डेडलाइन पाळली गेली नाही. त्यानंतर आता १० जून पर्यंत सर्व पावसाळी कामे पूर्ण करण्याची डेडलाइन आखून देण्यात आली आहे.नगरअभियंता प्रशांत वाघमारे, सहायक आयुक्त श्रीनिवास बोनाला, व्ही.जी.कुलकर्णी, मदन आढारी, संदिप खांडवे, राजेंद्र राऊत, अनिरुध्द पावसकर, प्रविण गेडाम, हेंमत देवधर, विजयकुमार शिंदे, नरेंद्र साळुंखे, युवराज देशमुख, श्रीकृष्ण चौधरी आणि नंदकिशोर जगताप या अधिकार्यांवर क्षेत्रिय कार्यालयनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी सफाईच्या कामाांची तपासणी करायची आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचाही आढावा घेण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.क्षेत्रिय कार्यालयांना पावसाळी कामे पूर्ण करण्यासाठी येणार्या अडचणींचा यावेळी आढावा घेण्यात आला. काही क्षेत्रिय कार्यालयांना यंत्रसामुग्री कमी पडत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यानुसार त्यांना तातडीने त्याची व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. आत्पकालीन व्यवस्थापनाबाबतही चर्चा करण्यात आली.पीएमसी केअरच्या माध्यमातून क्षेत्रिय कार्यालय निहाय व विविध खातेनिहाय प्राप्त झालेल्या आकडेवारीचा आढावा आयुक्तांनी घेतला. दैनंदिन कामकाजाच्या अनुषंगाने पीएमसी केअर तसेच सोशल मिडीया व मनपा संकेतस्थळ, स्वागत कक्ष, लोकशाही दिन या विविध माध्यमातून येणार्या तक्रारींचे जलद निवारण करण्याचेही आदेश तयांनी दिले आहेत. स्वच्छ भारत अभियानांर्तगत घनकचरा व्यवस्थापनाकरीता कामकाज स्तर वाढविणे, घरोघरी कचरा उचण्याच्या प्रमाणात वाढ करणे, जादा व सातत्याने कचरा होणार्या जागांचे नियोजन करून कचर्यामध्ये घट करणे आदी उपाय योजना करण्यास यावेळी सांगण्यात आले.