बलात्कारानंतर पीडितेची मदतीसाठी धावाधाव, मृत मुलीला हातात घेऊन मेट्रो प्रवास
By admin | Published: June 7, 2017 08:44 AM2017-06-07T08:44:22+5:302017-06-07T08:44:22+5:30
नेहमी हजारोंच्या संख्येने मेट्रो प्रवास करणा-यांमध्ये 30 मे रोजी एक तरुणीदेखील आपल्या आठ वर्षाच्या मृत बाळासोबत प्रवास करत होती
Next
>ऑनलाइन लोकमत
गुरुग्राम, दि. 7 - नेहमी हजारोंच्या संख्येने मेट्रो प्रवास करणा-यांमध्ये 30 मे रोजी एक तरुणीदेखील आपल्या आठ वर्षाच्या मृत बाळासोबत प्रवास करत होती. काही वेळापुर्वीच तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. शेअर ऑटोत प्रवास करत असताना ड्रायव्हर आणि दोन प्रवाशांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करत असताना तिच्या आठ महिन्याच्या बाळाला त्या नराधमांनी रिक्षातून फेकून दिलं होतं. ज्यामध्ये त्या बाळाचा मृत्यू झाला. आपल्या मृत बाळाला घेऊन पीडितेने खूप धावाधाव केली, पण अखेर ते बाळ जगू शकले नाही.
बलात्कारानंतर रात्री 2 वाजता जेव्हा नराधमांनी पळ काढला तेव्हा पीडित तरुणी काहीच हालचाल न करणा-या आपल्या बाळाला हातात घेऊन मदतीसाठी रस्त्यावर धावत होती. शेवटी एका रिक्षातून तिने आपलं सासर गाठलं. डॉक्टरांकडे गेली असता बाळाचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं.
डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केल्यानंतरही तिचा विश्वास बसत नव्हता म्हणून तिने आपल्या सासू - सास-यांसोबत दिल्लीतील तुघलकाबादमधील आपल्या आई - वडिलांचं घर गाठलं. तिथून त्यांनी मेट्रोने प्रवास केला आणि डॉक्टरकडे गेले. मात्र त्या डॉक्टरांनीही बाळ मृत झाल्याचंच सांगितलं. हातात आपल्या बाळाचा मृतदेह घेऊन ती गुरुग्रामला पोहोचली. तिचा पती आणि पोलीस एम जी रोड स्टेशनला तिची वाट पाहत उभे होते. यानंतर पीडितेने पोलिसांकडे तक्रार केली.
बलात्कारातून वाचलेल्या या धाडसी पीडितेने मानेसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून ती फक्त 19 वर्षांची आहे.
नेमकं काय झालं होतं -
शेजाऱ्यांशी भांडण झाल्यामुळे आपल्या ८ महिन्यांच्या मुलीला पीडित तरुणी आपल्या सासू - सास-यांकडे चालली होती. यावेळी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. इतकंच नाही तर बलात्का-यांनी तिच्या आठ महिन्याच्या मुलीला खेचून चालत्या रिक्षेतून बाहेर फेकून दिलं. त्यावेळी फुटपाथवर डोक आपटलं गेल्यानं त्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. नंतर त्या नराधमांनी एका सामसूम जागी रिक्षा थांबवून महिलेवर सामूहिक बलात्कार करून ते पळून गेल्याचं समोर आलं .
पीडित तरुणी आपल्या पतीसोबत बासकुसला गावात राहणारी होती. 29 मे रोजी रात्रीच्या सुमारात तिच्या पतीचं शेजाऱ्यांशी जोरदार भांडण झालं. त्यानंतर नाइट शिफ्ट असल्याने तो कामावर निघून गेला. पीडित तरुणीचा पती कामावर गेल्याचं पाहून शेजाऱ्यांनी पुन्हा महिलेशी भांडण सुरू केलं. भांडणाला कंटाळून तरुणी आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला घेऊन सासू सा-यांकडे जाण्यासाठी निघाली होती. ती आयएमटी चौकात पोहचली. पण रात्री रस्त्यावर कोणतंही वाहन न दिसल्याने तिने एका ट्रकवाल्याकडून लिफ्ट मागितली. ट्रकमध्ये बसल्यावर चालकाने छेडछाड सुरू केली. शेवटी ती पुढे खेडकीदौला टोलनाका येताच उतरून गेली. टोलनाक्यावरून तिने एक रिक्षा पकडली होती. त्या रिक्षेत आधीच तीन तरुण बसले होते. तरीही लवकर पोहोचता यावं म्हणून ती त्या रिक्षेत बसली. मुलीला मांडीवर घेऊन रिक्षेमध्ये बसताच त्या तीन तरुणांनी छेड काढायला सुरुवात केली. तिने आरडाओरडा सुरू करताच तिची मुलगीही घाबरून रडायला लागली. त्याबरोबर त्या तरुणांनी मुलीला खेचून घेत चालत्या रिक्षेतून फेकून दिलं. त्यानंतर एका अज्ञात जागी रिक्षा थांबवून सामूहिक बलात्कार करून ते पळून गेल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तशाच अवस्थेत पीडित तरुणी घरी पोहचली. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात मुलीच्या खुनाचा गुन्हा नोंदविला. पण हे सगळं सुरू असताना त्या तरुणीने तिच्यावर बलात्कार झाला असल्याचं सांगितलंसुद्धा नाही. दोन दिवसांनी तिने याविषयी आपल्या पतीला सांगितल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.