उर्जित पटेल यांची कमतरता जाणवेल, राजीनाम्यानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 06:31 PM2018-12-10T18:31:13+5:302018-12-10T18:32:22+5:30

उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

After resignation of urjit patel modi react on tweet, We will miss him immensely | उर्जित पटेल यांची कमतरता जाणवेल, राजीनाम्यानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट 

उर्जित पटेल यांची कमतरता जाणवेल, राजीनाम्यानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट 

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पटेल यांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी, आरबीआयसाठी आणि सरकारसाठी नुकसानदायक असल्याचे भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीहीउर्जित पटेल यांची कमतरता सातत्याने जाणवेल, असे म्हटले आहे. 

उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उर्जित पटेल मोदी सरकारच्या दडपणाखाली काम करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर, आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बँकेतील सुत्रानुसार, पटेल ऑफिसला आले तेव्हापासूनच शांत होते, दुपार नंतर राजीनामा देत ते निघून गेले. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पटेल यांच्यासोबत काम करणं ही माझ्यासाठी आनंददायक गोष्ट होती. त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा मला नेहमी फायदा झाला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा." असंही ते पुढे म्हणाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची कमी कायम जाणवेल असे म्हटले आहे. 


उर्जित पटेल हे शक्तिशाली अर्थशास्त्रज्ञ होते, तसेच अर्थव्यवस्थेतील लहान-सहान बाबींवरही त्यांचा अभ्यास आहे. उर्जित पटेल यांच्यामुळेच देशाच्या बँक व्यवस्थेत गतीमानता आली. तर, त्यांच्या नेतृत्वातच रिझर्व्ह बँकेने आर्थिक स्थैर्य गाठले होते, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. दरम्यान, मी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नरपद भूषवणं तसेच RBIच्या इतर पदांवर काम करणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती असं त्यांनी म्हटलं आहे.


Web Title: After resignation of urjit patel modi react on tweet, We will miss him immensely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.