योगी माघारी फिरताच शहीदाच्या घरातून उचलून नेला एसी, सोफा सेट

By admin | Published: May 15, 2017 12:22 PM2017-05-15T12:22:35+5:302017-05-15T12:22:35+5:30

उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने शहीद जवानाच्या कुटुंबियांचा अपमान केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

After the return of the Yogi, he took the car from the martyr's house, took the AC, sofa set | योगी माघारी फिरताच शहीदाच्या घरातून उचलून नेला एसी, सोफा सेट

योगी माघारी फिरताच शहीदाच्या घरातून उचलून नेला एसी, सोफा सेट

Next

 ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. 15 - उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने शहीद जवानाच्या कुटुंबियांचा अपमान केल्याचे प्रकरण समोर आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी रविवारी शहीद जवान प्रेम सागर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुख्यमंत्री भेटीसाठी येणार म्हणून स्थानिक प्रशासनाने प्रेम सागर यांच्या घरात एसी, कार्पेट, सोफा आणि टॉवल आदी साहित्याची व्यवस्था केली होती. कुटुंबियांची भेट घेऊन योगी माघारी फिरताच लगेचच प्रशासनाने या सर्व वस्तू उचलून घराबाहेर नेल्या. 
 
पाकिस्तानी लष्कराने दोन आठवडयांपूर्वी नियंत्रण रेषेवर केलेल्या हल्ल्यात  प्रेम सागर शहीद झाले होते. पाकिस्तानी लष्कराने त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. देवरीया गावात राहणा-या प्रेम सागर यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांशी बोलणे होत नाही तो पर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. योगी आदित्यनाथ यांनी फोनवरुन चर्चा करुन भेटण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबियांनी शहीद प्रेम सागर यांच्यावर अंत्यसंस्कार केले. 
 
योगी आदित्यनाथ ज्या खोलीत भेटणार त्याठिकाणी स्थानिक प्रशासनाने एसी, सोफासेट, कार्पेट असे साहित्य आणून ठेवले होते तसेच वीजपुरवठा खंडीत होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे भेट झाल्यानंतर अधिकारी तिथे आले व सर्व साहित्य गाडीत टाकून निघून गेले असे कुटुंबियांनी सांगितले. 
 
प्रशासनाने आमचा अपमान केला आहे, स्थानिक प्रशासनाला इतकी घाई करण्याची गरज नव्हती ते दोन ते तीन दिवस थांबू शकत होते अशी प्रतिक्रिया दया शंकर यांनी दिली. ते सुद्धा बीएसएफमध्ये आहेत. योगींनी आर्थिक मदतीचे आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरीचे आश्वासन दिले आहे. प्रेम सागर, परमजीत सिंग आणि आणखी एक जण नियंत्रण रेषेवर गस्तीवर असताना पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. 2 मे रोजी सकाळी त्यांचे मृतदेह सापडले. पाकिस्तानने त्यांच्या मृतदेहाची विटंबना केलेली होती. 
 

Web Title: After the return of the Yogi, he took the car from the martyr's house, took the AC, sofa set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.