अजबच! दिल्लीत जोडप्याला लुटताच मिळाले २० रूपये; चोरटे भावुक, १०० रूपये देऊन फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 12:44 PM2023-06-26T12:44:49+5:302023-06-26T12:45:14+5:30

देशाची राजधानी दिल्ली येथे दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

 After robbing a couple in Delhi, the thieves got Rs 20 and they gave Rs 100, but the Delhi Police have arrested the accused Harsh and Dev  | अजबच! दिल्लीत जोडप्याला लुटताच मिळाले २० रूपये; चोरटे भावुक, १०० रूपये देऊन फरार

अजबच! दिल्लीत जोडप्याला लुटताच मिळाले २० रूपये; चोरटे भावुक, १०० रूपये देऊन फरार

googlenewsNext

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरटे निर्भयपणे खून, दरोडा, जीवे मारण्याचा प्रयत्न, महागड्या वस्तू हिसकावून घेण्यासारख्या घटना करत आहेत. ही लूटमार करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी २ चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून ३० मोबाईल जप्त केले आहेत. याशिवाय दिल्ली पोलिसांना तपासादरम्यान एक सीसीटीव्ही फुटेजही सापडले आहे.

पिस्तुल दाखवून जोडप्याला लुटले
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका जोडप्याला पिस्तुल दाखवून लुटत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खरं तर या चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या जोडप्याकडे केवळ २० रूपये सापडले. त्यानंतर चोरट्यांनी या जोडप्याला १०० रुपये देऊन तिथून पळ काढला. देव आणि हर्ष अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.  

स्थानिक पोलिसांनी सांगितले की, २१ जून रोजी सलग तीन फोन आले. पहिल्या कॉलमध्येच एका जोडप्याचे दागिने हिसकावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दुसऱ्या कॉलवरून एका व्यक्तीकडून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली. तिसऱ्या कॉलवरून पिस्तुल दाखवून लुटण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली. पण तिन्ही कॉल वेगवेगळ्या लोकांनी केले होते. तिसरा कॉल आला त्यानंतर स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मग संशयिताकडे पिस्तुल असल्याचे आढळून आले. दरोडेखोरांनी एका जोडप्याकडून दागिने लुटण्याचा प्रयत्न केला असता ते दागिने बनावट असल्याचे समोर आले. यावरून चोरट्यांनी जोडप्याचा खूप अपमान केला अन् त्यांनी १०० रूपये देऊन तिथून पळ काढला. तपासाअंती चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. 

आरोपी देव आणि हर्ष यांना अटक
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि गुन्हेगारांचा माग काढण्याचे काम केले. जवळपास २०० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना इतरही अनेक ठिकाणी लूटमार केल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस या दरोडेखोरांचा माग काढत जगतपुरी येथे पोहोचले आणि ३१ वर्षीय हर्ष राजपूत याला अटक केली मग देवचा शोध लागला.

Web Title:  After robbing a couple in Delhi, the thieves got Rs 20 and they gave Rs 100, but the Delhi Police have arrested the accused Harsh and Dev 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.