सीमा हैदरनंतर मेहविश, दोन मुलांची आई लग्न करून भारतात आली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 10:34 AM2024-07-29T10:34:38+5:302024-07-29T10:35:06+5:30
पाकिस्तानातून आलेल्या दोन मुलांच्या आईने राजस्थानमधील तरुणाशी लग्न केले आहे. मेहविश असे या महिलेचे नाव असून ती राजस्थानच्या बिकानेरमध्ये भारतीय प्रियकरासोबत राहण्यासाठी आली आहे.
भारत पाकिस्तानमधून विस्तवही जात नाहीय तिथे तरुण, तरुणी लग्न करत आहेत. गेल्या वर्षी सीमा हैदरने भरपूर प्रसिद्धी मिळविली होती. पाकिस्तानातून आलेल्या या महिलेने भारतीय तरुणाशी लग्न केले होते. आता असाच कित्ता ब्यूटी पार्लर चालविणाऱ्या दोन मुलांच्या आईने केला आहे.
पाकिस्तानातून आलेल्या दोन मुलांच्या आईने राजस्थानमधील तरुणाशी लग्न केले आहे. मेहविश असे या महिलेचे नाव असून ती राजस्थानच्या बिकानेरमध्ये भारतीय प्रियकरासोबत राहण्यासाठी आली आहे. या प्रेम कहाणीमध्ये कुवेत आणि सौदी असे आणखी दोन देश सहभागी आहेत.
मेहविशही पाकिस्तानच्या लाहोरची राहणारी आहे. मेहविशने २००६ मध्ये बादामी बागच्या व्यक्तीशी लग्न केले होते. त्यांना १२ आणि ७ वर्षांचे दोन मुलगे आहेत. २०१८ मध्ये त्यांनी तलाक घेतला होता. यानंतर तिच्या पतीने दुसरे लग्न केले होते.
राजस्थानचा राहणारा रहमान हा कुवेतला ट्रान्सपोर्टर म्हणून नोकरी करत होता. त्याची मेहविशशी फेसबुकवर ओळख झाली. दोघे प्रेमात पडले. यानंतर मेहविशने तिची बहीण आणि बहीणीचा नवरा यांना ही गोष्ट सांगितली. यानंतर १३ मार्च २०२२ ला रहमानने तिला प्रपोज केले. या दोघांनी १६ मार्चला व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे लग्न केले. यानंतर २०२३ मध्य मक्केला जात तिथे विवाह केला.
आता २५ जुलैला मेहविशने वाघा बॉर्डर क्रॉस करत भारतात पाऊल ठेवले. टुरिस्ट व्हिसावर ती ४५ दिवसांसाठी भारतात आली आहे. रहमानने तिला त्याच्या गावी पीथिसारला आणले आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागली असून स्थानिक पोलिसही तपास करत आहेत.