लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर टाटा मोटर्सचा अधिकारी रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 02:14 AM2018-10-14T02:14:50+5:302018-10-14T02:15:19+5:30
नवी दिल्ली : महिलांच्या लैंगिक शोषणाची अनेक प्रकरणे आता उघडकीस येत असून, बड्या कंपन्यांमध्येही असे प्रकार सुरू असल्याचे दिसू ...
नवी दिल्ली : महिलांच्या लैंगिक शोषणाची अनेक प्रकरणे आता उघडकीस येत असून, बड्या कंपन्यांमध्येही असे प्रकार सुरू असल्याचे दिसू लागले आहे. एका कर्मचारी महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे टाटा मोटर्सने आपल्या कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे प्रमुख सुरेश रंगराजन यांना रजेवर पाठविले आहे.
यासंदर्भात स्वत: सुरेश रंगराजन यांनी बोलण्यास नकार दिला; मात्र जग्वार लँड रोव्हरने ट्विट करून सुरेश रंगराजन यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती दिली. निष्पक्ष चौकशीसाठी हे पाऊ ल उचलल्याचे कंपनीने म्हटले आहे. टाटा मोटर्सच्या मानव संसाधन विभागाच्या (एचआर) प्रमुखाने टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आरोपांची चौकशी केली जाणार आहे. लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याची अंमलबजावणी नीट व्हावी, यासाठी कंपन्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून हा कायदा नेमका काय आहे आणि लैंगिक शोषण वा अत्याचार यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, याची माहिती कर्मचाऱ्यांना देण्याचे त्यांनी ठरविले आहे.
या कायद्याखाली येणाºया तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत असल्याचे एका बड्या कंपनीच्या मानव संसाधन विकास विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे कायद्याची माहिती व काय टाळावे, याची माहिती देणाºया संस्थांना खूपच मागणी वाढली आहे.
तक्रारींमध्ये वाढ
कार्यालयांतील लैंगिक शोषणाविरुद्ध केंद्र सरकारने पॉश (प्रिव्हेंशन आॅफ सेक्शुअल हॅरेसमेंट) कायदा केला आहे. त्याची माहिती काही संस्था व या विषयातील तज्ज्ञ यांच्यामार्फत कर्मचारी व अधिकारी वर्गाला देण्यात येत आहे.