शरजील इमामनंतर या तरुणीच्या वक्तव्यावरून वादंग, अफझल गुरू निर्दोष असल्याचा केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 12:32 PM2020-01-27T12:32:20+5:302020-01-27T12:33:40+5:30
केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि विचाराधीन असलेल्या एनआरसीवरून सध्या देशातील वातावरण पेटलेले आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि विचाराधीन असलेल्या एनआरसीवरून सध्या देशातील वातावरण पेटलेले आहे. दिल्लीतील शाहीन बागसारख्या ठिकाणी सुरू झालेल्या आंदोलनामुळे सरकारवरील दबाव वाढत आहे. दरम्यान, या आंदोलनात सहभागी होत असलेल्या मंडळींकडून करण्यात येत असलेल्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे वादास तोंड फुटत आहे. एकीकडे शरजील इमामने आसामसह पूर्वोत्तर भारत देशाच्या मुख्य भागापासून वेगळे करण्याचा मनसुबा व्यक्त करणाऱ्या केलेल्या विधानावरून वाद झाला असतानाच आता शाहीन बाग येथील आंदोलनातील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत कुख्यात दहशतवादी अफझल गुरू हा निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
शाहीनबागमधील आंदोलनात प्रजासत्ताक दिन, मध्यरात्रीच सुरू झाला सोहळा
हिंसा कुठल्याच समस्येचं समाधान नाही, 'मन की बात'मधून शांतीचा संदेश
युवकांनी अहिंसक मार्गाने लढा द्यावा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आवाहन
भाजपा नेते संबित पात्रा यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ''आता त्या नापाक शरजील इमामनंतर या बाई काय म्हणताहेत तेही ऐका. आमचा कुणावरही विश्वास नाही, सर्वोच्च न्यायालयावरसुद्धा विश्वास नाही. अफझल गुरू निर्दोष होता. रामजन्मभूमीवर मशीद बांधायची होती. मित्रानो एवढी विषाची शेती या काही दिवसांत तर झालेली नाही?'' असा सवाल संबित पात्रा यांनी उपस्थित केला आहे.
अब उस नापाक शरजील इमाम के बाद जरा इस मोहतरमा को भी सुन लीजिए-
— Sambit Patra (@sambitswaraj) January 26, 2020
“हमें किसी पे भरोसा नहीं है”
“इस Supreme Court पर भी विश्वास नहीं”
अफ़ज़ल गुरु निर्दोष था
रामजन्मभूमि पर मस्जिद बनना था ...
दोस्तों इतने ज़हर की खेती(वो भी mass manufacturing) इन कुछ ही दिनो में तो नहीं हुआ होगा?? pic.twitter.com/S6IWU22gKo
या व्हिडीतओत दिसत असलेली तरुणी म्हणते की, आम्ही सीएए आणि एनआरसीमुळे आंदोलनात उतरलो आहोत. आम्ही केवळ त्याच्याविरोधात आंदोलन सुरू केलेले नाही. आता आम्ही सरकारवर विश्वास ठेवू शकत नाही, ना सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवू शकत. सर्वोच्च न्यायालयाने अफझल गुरू याला देशातील कलेटिक्टिव्ह कॉन्शससाठी फाशीवर चढवले. आता अफझल गुरूचा संसदेवरील हल्ल्यात कुठलाही हात नसल्याचे समोर आले आहे. कोर्ट एकदा सांगते की बाबरी मशिदीच्या खाली मंदिर नव्हते. मशिदीचे ताळे तोडणे चुकीचे होते. मशीद पाडणे चुकीचे होते. मात्र नंतर सांगते की त्या ठिकाणी मंदिर बनणार,''
तत्पूर्वी शाहीन बाग येथील आंदोलनाशी संबंधित असलेल्यांनी आपल्या आंदोलनाचा कुणीही नेता नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच शरजील इमामशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले होते. तसेच शरजील इमाम याने शाहीन बाग येथे हे विधान केले नव्हते, असाही दावा या मंडळींनी केला आहे. तसेच शाहीन बाग येथील आंदोलन हे महिला करत असून, शरजील याचे त्याच्याशी काहीही घेणे देणे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.