श्रीरामानंतर श्रीकृष्णही कोर्टात, मथुरेतील मंदिराशेजारील मशीद हटवण्याबाबतची याचिका न्यायालयाने स्वीकारली

By बाळकृष्ण परब | Published: October 16, 2020 07:20 PM2020-10-16T19:20:41+5:302020-10-16T19:23:48+5:30

shri krishna janmabhoomi News : श्रीकृष्ण जन्मस्थान प्रकरणी श्रीकृष्ण विराजमान आणि रंजना अग्निहोत्री यांच्यासह आठ जणांकडून जिल्हा न्यायाधीशांच्या कोर्टात दाखल केली आहे

After Shri Ram, Shrikrushna also in court, the court accepted the petition to remove the mosque near the temple in Mathura | श्रीरामानंतर श्रीकृष्णही कोर्टात, मथुरेतील मंदिराशेजारील मशीद हटवण्याबाबतची याचिका न्यायालयाने स्वीकारली

श्रीरामानंतर श्रीकृष्णही कोर्टात, मथुरेतील मंदिराशेजारील मशीद हटवण्याबाबतची याचिका न्यायालयाने स्वीकारली

Next
ठळक मुद्देमथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या प्रांगणात असलेली मशीद हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका मथुरा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांनी स्वीकारलीया याचिकेवर १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहेया याचिकेवर जिल्ह्या न्यायालयात खटला चालणार

मथुरा - अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागल्यानंतर आता मथुरेमधील श्रीकृष्ण जन्मभूमीचा विषय ऐरणीवर आला आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या प्रांगणात असलेली मशीद हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका मथुरा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांनी स्वीकारली आहे. आता या याचिकेवर १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळाशेजारी असलेली याचिका हटवण्याची मागणी या याचिकेमधून केली आहे. आता या याचिकेवर जिल्ह्या न्यायालयात खटला चालणार आहे.

मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीबाबत दाखल याचिका न्यायाधीशंनी स्वीकारली आहे. आता श्रीकृष्ण जन्मभूमीशेजारील शाही मशीद हटवण्याच्या मागणीबाबत प्रतिवादी पक्षाला नोटीस जारी होणार आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर वादी पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी माहिती दिली. या प्रकरणाची ही सुनावणी १८ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे.

श्रीकृष्ण जन्मस्थान प्रकरणी श्रीकृष्ण विराजमान आणि रंजना अग्निहोत्री यांच्यासह आठ जणांकडून जिल्हा न्यायाधीशांच्या कोर्टात दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी विरोधी पक्षांना नोटीस जारी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सिव्हिल जज सिनियर यांच्या डिव्हिजन कोर्टात श्रीकृष्ण जन्मस्थान सेवासंघ आणि शाही मशीद ईदगाह कमिटीदरम्यान, १९६८ मध्ये झालेला करार रद्द करून मशिदीला हटवण्याची आणि सर्व जमीन श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टला सोपवण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सिव्हील जज सिनियर डिव्हिजनच्या न्यायालयाने भक्तांना दावा दाखल करण्याचा अधिकार नाही, असे सांगत ही याचिका फेटाळून लावली होती. आज या प्रकरणी जिल्हा न्यायाधीशांच्या कोर्टात सुनावणी झाली होती. या सुनावणीनंतर अपील स्वीकारण्याल आले. दरम्यान या प्रकरणात आपला दावा मजबूत असल्याचे वादी पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले.

Web Title: After Shri Ram, Shrikrushna also in court, the court accepted the petition to remove the mosque near the temple in Mathura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.