‘१०० रुपये खर्च झाल्यावर ४५ रुपयेच वसूल होतात’; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 06:13 AM2023-05-27T06:13:11+5:302023-05-27T06:13:30+5:30
- संजय शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : रेल्वे देशातील जनतेला ५९ हजार कोटी रुपयांची सबसिडी देत आहे. रेल्वेचे ...
- संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रेल्वे देशातील जनतेला ५९ हजार कोटी रुपयांची सबसिडी देत आहे. रेल्वेचे १०० रुपये खर्च झाल्यावर जनतेकडून केवळ ४५ रुपये वसूल होतात, असे केंद्रीय रेल्वे व दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
रेल्वेचे सध्याचे तिकीटही लोकांना महाग वाटते. त्यांना मी सांगू इच्छितो की, रेल्वेचे १०० रुपये खर्च होतात, तेव्हा केवळ ४५ रुपयेच वसूल होतात. प्रत्येक वर्षी रेल्वेकडून ५९ हजार कोटींपेक्षा जास्त सबसिडी जनतेला दिली जाते, असे वैष्णव यांनी सांगितले. रेल्वेची मागणी व पुरवठ्यातील अंतर ३०० कोटींचे अंतर आहे. हे अंतर कमी करण्यासाठी चार ते पाच वर्षे आणखी लागतील.
भारताचे रेल्वेचे जाळे विस्तारतेय
भारताच्या रेल्वेच्या जाळ्याबाबत ते म्हणाले की, स्वित्झर्लंडचे रेल्वेचे जेवढे एकूण नेटवर्क आहे, तेवढे भारत दरवर्षी नेटवर्क वाढवतो. भारताची लोकसंख्या फार वाढली असून, मागणीही खूपच जास्त आहे.