कुशीत बाळ अन् हातात काठी...; रेल्वे स्थानकावरील महिला कॉन्स्टेबलच्या कर्तव्यनिष्ठेला सॅल्यूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 11:48 IST2025-02-18T11:47:23+5:302025-02-18T11:48:18+5:30

एका महिला आरपीएफ अधिकाऱ्याने आपल्या मुलाची काळजी घेत आपलं कर्तव्य बजावलं.

after stampede rpf woman constable performing duty with child at new delhi railway station | कुशीत बाळ अन् हातात काठी...; रेल्वे स्थानकावरील महिला कॉन्स्टेबलच्या कर्तव्यनिष्ठेला सॅल्यूट

कुशीत बाळ अन् हातात काठी...; रेल्वे स्थानकावरील महिला कॉन्स्टेबलच्या कर्तव्यनिष्ठेला सॅल्यूट

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. याच दरम्यान एका महिला आरपीएफ अधिकाऱ्याने आपल्या मुलाची काळजी घेत आपलं कर्तव्य बजावलं. हे स्त्री शक्तीचं एक अद्भुत उदाहरण आहे, महिला कॉन्स्टेबल कामाची आणि कर्तव्याची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडत आहे.
 
आपल्या कर्तव्याबद्दल जबाबदार असण्यासोबतच त्यांनी आईची जबाबदारी देखील पार पाडली. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बाळाला सोबत घेऊन त्या प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून व्यवस्थापन करत आहेत.

आरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल रीना यांचा हा फोटो असल्याचं समोर आलं आहे. आपल्या बाळाला कुशीत घेऊन त्या प्रवाशांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी टाळण्यासाठी इशारा देत आहेत.

रेल्वे स्थानकावरील रीना यांचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत आणि लोक त्यांच्या शौर्याचं आणि समर्पणाचं कौतुक करत आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच खूप जण जखमी झाले आहेत. 

Web Title: after stampede rpf woman constable performing duty with child at new delhi railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.