दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांवर झाली दगडफेक

By admin | Published: April 27, 2017 03:06 PM2017-04-27T15:06:05+5:302017-04-27T15:12:15+5:30

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांवर दगडफेक करण्यात आली.

After the terror attack, the rioters took place on the soldiers | दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांवर झाली दगडफेक

दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांवर झाली दगडफेक

Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 27 - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा लष्करी कॅम्पला टार्गेट करत त्यावर भ्याडा हल्ला चढवला. गुरुवारी कुपवाडा येथे झालेल्या या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात लष्काराच्या प्रमुख अधिका-यासहीत तीन जवानांना गमावणा-या जवानांना यानंतर दगडफेकीचाही सामना करावा लागला. 
 
हल्ल्यानंतर घटनास्थळी शोध मोहीम सुरू असताना काही स्थानिकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खो-यात दहशतवादी हल्ले आणि सुरक्षा दलांवरील दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने केंद्र सरकारवरील तणाव वाढला आहे.  
 
गेल्या वर्षी 8 जुलै रोजी हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीचा खात्मा केल्यानंतर काश्मीर खो-यातील परिस्थिती आणखीनच ढवळून निघाली आहे. 
 
(जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ल्यात 3 जवान शहीद, 2 दहशतवादी ठार)
गुरुवारी सकाळी जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. पंझगाम येथे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी लष्कर कॅम्पवर हल्ला केला. लष्कराने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं असून दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. मात्र दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. 
 
यामध्ये एक मेजर, एक जेसीओ आणि एका जवानाचा समावेश आहे. कॅप्टन आयुष असे शहीद झालेल्या अधिका-याचे नाव आहे. पाच जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी श्रीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद या हल्ल्यामागे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेजवळ असलेल्या लष्करी कॅम्पमध्ये आत्मघाती स्फोट घडवण्याच्या हेतूने घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र लष्कराने त्यांचा डाव उधळत चोख प्रत्युत्तर दिलं. लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले.  

Web Title: After the terror attack, the rioters took place on the soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.