अपघातानंतर तरुणाला मदत करायची सोडून त्याची बाईक पळविली, पुढे चोरांचाही अपघात झाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:35 IST2025-01-16T16:35:01+5:302025-01-16T16:35:14+5:30

तरुण गाडीवरून पडला आणि विव्हळत असताना तिथे तिघेजण आले होते. त्याना त्याने मदतीसाठी आवाहन केले. परंतू, त्यांनी मदत करायचे सोडून त्याची पडलेली बाईक पळविली.

After the accident, they tried to help the young man and stole his bike, and later the thieves also had an accident... | अपघातानंतर तरुणाला मदत करायची सोडून त्याची बाईक पळविली, पुढे चोरांचाही अपघात झाला...

अपघातानंतर तरुणाला मदत करायची सोडून त्याची बाईक पळविली, पुढे चोरांचाही अपघात झाला...

इथेच करावे आणि इथेच भोगावे, असा प्रकार दिल्लीत घडला आहे. एक व्यक्ती बाईकवरून सकाळी ऑफिसला जात होता. अचानक त्याची बाईक घसरली व तो गंभीर जखमी झाला. रस्त्यावर पडलेला असताना तो वेदनेने विव्हळत होता. यावेळी काही चोर तिथे आले आणि त्यांनी त्याला मदत न करता त्याची बाईक घेऊन पोबारा केला. त्या तरुणाला मदत न मिळाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. परंतू, त्याच्या बाईक चोरणाऱ्यांना देखील पुढे हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले आहे. 

तरुण गाडीवरून पडला आणि विव्हळत असताना तिथे तिघेजण आले होते. त्याना त्याने मदतीसाठी आवाहन केले. परंतू, त्यांनी मदत करायचे सोडून त्याची पडलेली बाईक पळविली. बाईक चोरल्यानंतर त्यांचा मेहरौली-बदरपूर रोडवर अपघात झाला. या तिघांना एम्स ट्रॉमा सेंटरला नेले गेले. यापैकी एक कोमामध्ये असून गंभीर आहे. तर दोघांना किरकोळ लागले आहे. 

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये या तिघांना बाईक चोरताना पाहिले आहे. पोलिसांना दोन्ही अपघाताची माहिती मिळाली होती. यानंतर तपास केला असता हे अपघात एकमेकांशी संबंधीत असल्याचे समोर आले. सीसीटीव्हीनुसार हे तिघे त्या जखमी तरुणाला तसेच सोडून त्याची बाईक चोरून नेताना दिसत आहेत. 

हे दोन्ही अपघात ३० मिनिटांच्या अंतराने झाले आहेत. दोन्ही अपघात वेगवेगळे असले तरी पहिला तरुण विकास याला मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे तिघेही आरोपी याला कारणीभूत आहेत. यानुसार तपास केला जात असून या तिघांनी दुचाकी चोरल्यानंतर नशा केलेली का याचीही तपासणी केली जाणार आहे. 
 

Web Title: After the accident, they tried to help the young man and stole his bike, and later the thieves also had an accident...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात