'द केरळ स्टोरी'नंतर आता 'अजमेर 92' वरून वाद; होतेय बंदीची मागणी? जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 12:34 IST2023-06-06T12:34:45+5:302023-06-06T12:34:45+5:30
बरेलीतील ऑल इंडिया मुस्लीम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी यासंदर्भात बोलताना, हा चित्रपट देशातील लोकांना भ्रमित करणारा आणि समाजात फूट पाडणारा असल्याचे म्हटले आहे.

'द केरळ स्टोरी'नंतर आता 'अजमेर 92' वरून वाद; होतेय बंदीची मागणी? जाणून घ्या कारण
द केरळ स्टोरीनंतर आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचे नाव आहे, 'अजमेर 92'. या चित्रपटावर बंदीची मागणी केली जात आहे. बरेलीतील ऑल इंडिया मुस्लीम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी यासंदर्भात बोलताना, हा चित्रपट देशातील लोकांना भ्रमित करणारा आणि समाजात फूट पाडणारा असल्याचे म्हटले आहे.
म्हणून होतेय बंदीची मागणी -
हा चित्रपट अजमेरमध्ये 250 हून अधिक मुलींवर झालेल्या बलात्कारावर आधारित आहे. यावर बोलताना मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी म्हणाले, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी यांचा दर्गा हिंदू मुस्लीम एकतेचे एक चांगले उदाहरण आहे. जो लोकांच्या मनावर गेल्या अनेक वर्षांपासून राज्य करतो. अजमेर शरीफमधून नेहमीच शांतीचा संदेश दिला जातो आणि तुटलेली मनं जोडण्याचे काम करतो. मौलाना चित्रपटासंदर्भात बोलताना म्हणाले, सध्या समाजात फूट पाडणाऱ्या आणि द्वेश पसरवणाऱ्या घटना धर्माच्या नावावर चित्रपट आणि सोशल मिडियाच्या माध्यमाने पसरवल्या जात आहेत.
ते पुढे म्हणाले, आझादी-ए-इजहारे रायच्या नावाने ख्वाजा साहिब यांच्या दर्ग्याची विटंबना करण्याची परवानगी कोणत्याही चित्रपट दिग्दर्शकाला दिली जाऊ शकत नाही. एक विशेष धर्माच्या लोकांना निशाना बनविण्यासाठी चित्रपटांचा सहारा घेतला जात आहे.
याशिवाय, अजमेर 92 चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर जमियातुल उलमा ए हिंदचे जनरल सेक्रेटरी नियाज अहमद फारुकी म्हणाले, चित्रपटांची नावे मुस्लिमांच्या नावेने ठेवून केवळ आणि केवळ आपसातील बंधुता नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि धर्मा धर्मात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ते म्हणाले, कुण्या एका धर्माला टर्गेट करणे चुकीचे आहे. आम्ही चित्रपटाला विरोध करत नाही. आमची केवळ एवढीच मागणी आहे, की कायद्या नुसार, या चित्रपटावर बंधी घालायला हवी.