चंद्रानंतर आता मिशन 'आदित्य', ISRO थेट सूर्यावर पोहोचणार! सुरू झालीय तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 10:39 AM2023-08-24T10:39:06+5:302023-08-24T10:41:01+5:30

Aditya L1 Mission : इस्रो सूर्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी लवकरच एक मिशन सुरू करत आहे. या सोलर मिशनचे नाव आहे आदित्य एल-1...

After the moon now the mission aditya l1 India ISRO will reach on the sun Preparations have started | चंद्रानंतर आता मिशन 'आदित्य', ISRO थेट सूर्यावर पोहोचणार! सुरू झालीय तयारी

चंद्रानंतर आता मिशन 'आदित्य', ISRO थेट सूर्यावर पोहोचणार! सुरू झालीय तयारी

googlenewsNext

इसरोच्या (ISRO) चंद्रयान-3ने (Chandrayaan-3) बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्राच्या दक्षिण धृवावर यशस्वी लँडिंग केले आणि इतिहास रचला. जगाच्या इतिहासात 23 ऑगस्ट 2023 ही तारीख सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली. संपूर्ण देशाने याचा आनंद साजरा केला. महत्वाचे म्हणजे, चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. मात्र आता चंद्रानंतर थेट सूर्याचा नंबर आहे. इस्रो सूर्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी लवकरच एक मिशन सुरू करत आहे. या सोलर मिशनचे नाव आहे आदित्य एल-1...

यासंदर्भात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच घोषणा केली आहे. आदित्य एल-1 सूर्याच्या संदर्भातील रहस्यांचा अभ्यास करणारे भारताचे पहिलेच मिशन असेल. हे स्पेसक्राफ्ट लॉन्च केल्यानंतर, चार महिन्यांनी सूर्य आणि पृथ्वीच्या सिस्टिममध्ये लँगरेन्ज पॉइंट-1 पर्यंत पोहोचेल. जो पृथ्वीपासून जवळपास 15 लाख किलोमीटर दूर आहे. लॅगरेन्ज प्वाइंट-1 वर सूर्याच्या ग्रहणाचा परिणाम होत नाही. यामुळे तेथे सहज पणे संशोधन केले जाऊ शकते.

आदित्य L-1 केव्हा लॉन्च होणार? यासंदर्भात अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. मात्र, एका न्यूज एजन्सीनुसार, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे मिशन लॉन्च केले जाऊ शकते. आदित्य L-1 स्पेसक्राफ्ट आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून लॉन्च केले जाईल.

भारत पहिल्यांदाच सूर्यावर संशोधन करणार -
भारत पहिल्यांदाच सूर्यावर संशोधन करणार आहे. मात्र आतापर्यंत सूर्यावर एकूण 22 मिशन पाठवण्यात आले आहेत. हे मिशन पूर्ण करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, जर्मनी, यूरोपियन स्पेस एजन्सीचा समावेश आहे. सर्वाधिक मिशन नासाने पाठवले आहेत.

युरोपियन स्पेस एजन्सीनेही नासासोबत संयुक्तपणे आपले पहिले सूर्य मिशन 1994 मध्ये पाठवले होते. नासाने एकट्यानेच एकूण 14 मिशन सूर्यावर पाठवले आहेत. नासाच्या पार्कर सोलर प्रोब नावाच्या एका व्यक्तीने सूर्याच्या जवळपासच्या भागातून 26 वेळा प्रवास केला आहे. नासाने 2001 मध्ये जेनेसिस मिशन लॉन्च केले होते. सूर्या भोवती चक्कर मारून सौर हवेचे सॅम्पल घेणे, असा याचा उद्देश होता.

Web Title: After the moon now the mission aditya l1 India ISRO will reach on the sun Preparations have started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.