आई गेल्यानंतर ‘मावशी’ने बछड्यांना जगविले; वाघिणीने बछड्यांना स्वीकारले, शिकारीचेही देत आहे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 11:19 AM2022-08-22T11:19:36+5:302022-08-22T11:19:56+5:30

जगात आईनंतर सर्वाधिक प्रेम देणारी व्यक्ती म्हणजे मावशी. मावशी म्हणजे आईप्रमाणेच सांभाळ करणारी. अर्थात ही नाती गाेती आणि त्यांची जाण माणसांनाच.

After the mother was gone aunt raised the calves tigress adopted the cubs | आई गेल्यानंतर ‘मावशी’ने बछड्यांना जगविले; वाघिणीने बछड्यांना स्वीकारले, शिकारीचेही देत आहे प्रशिक्षण

आई गेल्यानंतर ‘मावशी’ने बछड्यांना जगविले; वाघिणीने बछड्यांना स्वीकारले, शिकारीचेही देत आहे प्रशिक्षण

googlenewsNext

भाेपाळ :

जगात आईनंतर सर्वाधिक प्रेम देणारी व्यक्ती म्हणजे मावशी. मावशी म्हणजे आईप्रमाणेच सांभाळ करणारी. अर्थात ही नाती गाेती आणि त्यांची जाण माणसांनाच. मात्र, वन्यप्राण्यांमध्ये अशा प्रकारच्या नात्यांची जपणूक दिसली तर? मध्य प्रदेशात हे चित्र दिसत असून, इतर काेणी नव्हे तर चक्क एक वाघीण तिच्या भाच्यांचा सांभाळ करत आहे. या बछड्यांची आई मरण पावल्यानंतर त्यांची मावशी वाघीण त्यांना जंगलातील नियम आणि शिकारीचे प्रशिक्षण देताना दिसत आहे.

सिधी येथील संजय टुबरी राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पातील ही वाघीण आणि तिच्या भाच्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. मार्च महिन्यात टी-१८ वाघिणीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला हाेता. 

आईच्या मृत्यूनंतर तिच्या चार बछड्यांचे जगणे अतिशय कठीण झाले हाेते. त्यातच एका वाघाने एका बछड्याची शिकार केली. त्यानंतर टी-१८च्या बछड्यांना टी-२८ अर्थात त्यांच्या मावशीने जवळ केले. ती गेल्या काही महिन्यांपासून त्यांना जंगलात कसे राहायचे, कशी शिकार करायची, आदी गाेष्टींचे प्रशिक्षण देत आहे. एका अर्थाने मावशी तिच्या भाच्यांना जगणे शिकवीत आहे.

टी-१८ चा मृत्यू झाला त्यावेळी बछडे नऊ महिन्यांचे हाेते.  आता ते एक वर्ष आणि एक महिन्याचे झाले आहेत. जंगलात अनेकांना हे बछडे खेळताना आणि शिकारीचा सराव करताना दिसतात. हत्तींवर बसून गस्त देणारे पथक त्यांच्याकडे लक्ष ठेवून हाेते. त्यांना यावेळी शिकार पुरविण्यात येत हाेती. मात्र, एका बछड्याची शिकार झाल्यानंतर मावशीने त्यांना स्वीकारल्याचे कळताच वन अधिकाऱ्यांनाही आनंद झाला. 

५२६  मध्य प्रदेशात भारतातील सर्वाधिक वाघ आहेत. 
गेल्या सहा वर्षांमध्ये १७५ वाघांचा मृत्यू झाला आहे.

सिंह यांनी सांगितले की, टी-२८ वाघिणीचे स्वत:चे चार बछडे आहेत. मात्र, वाघिणीने बछड्यांमध्ये कधीही भेदभाव केल्याचे आढळले नाही. स्वत:च्या बछड्यांप्रमाणे त्यांना सांभाळले. 

मावशी आणि भाच्यांचा असा झाला मिलाप
टी-१८ वाघिणीच्या मृत्यूनंतर चारही बछडे अनाथ झाले. त्यानंतर एका बछड्याच्या शिकारीनंतर वन अधिकारी इतर बछड्यांच्या सुरक्षेबाबत चिंतित झाले. अशा वेळी त्यांना बछड्यांची मावशी आठवली. त्यांनी टी-२८ जवळ तिन्ही बछड्यांना साेडण्याचा निर्णय घेतला. ताे अतिशय याेग्य ठरला, असे व्याघ्र प्रकल्पाचे फील्ड डायरेक्टर वाय. पी. सिंह यांनी सांगितले.

कमलीने दिला दाेन्ही वाघिणींना जन्म
टी-१८ ही टी-२८ ची माेठी बहीण. टी-११ या वाघिणीच्या पाेटी त्यांचा जन्म झाला. तिच्या डाेक्यावर कमळासारखे चिन्ह हाेते. म्हणून तिला वन्यजीव प्रेमींनी कमली असे नाव दिले. ती या जंगलात खूप प्रसिद्ध हाेती. तिने आणखी एका टी-२९ वाघिणीला जन्म दिला आहे.

Web Title: After the mother was gone aunt raised the calves tigress adopted the cubs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ