पंजाबनंतर आता 'या' मोठ्या राज्यात विजयाच्या तयारीत आम आदमी पार्टी; तयार केला खास प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 04:39 PM2022-03-20T16:39:11+5:302022-03-20T16:40:01+5:30
जागीरदार म्हणाले, राजस्थानात पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा लवकरच करण्यात येईल.
जयपूर - पंजाब विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे आम आदमी पार्टीत जबरदस्त उत्साह संचारला आहे. आता आप राजस्थानात आपला पाय रोवण्याच्या विचारात आहे. पक्षातीन नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता 'आप' राजस्थानातील आपले संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने 26-27 मार्च रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय 'विजय उत्सव' संमेलनचे आयोजन करत आहे. यात, पक्षाचे प्रदेश प्रभारी आणि राज्यसभा खासदार संजय सिंह हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील.
राजस्थानात आपला पाय मजबूत करेल आप -
आपचे राज्य सहप्रभारी खेमचंद जागीरदार म्हणाले, पक्षाने हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राजस्थान हे पंजाबचे शेजारी राज्य आणि नवी दिल्लीच्या जवळ आहे. यामुळे राज्यातील संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाने 26 आणि 27 मार्च रोजी दोन दिवसीय राज्य संमेलन आयोजित केले आहे.
ते म्हणाले, पक्षाचे धोरणं तळागाळापर्यंत घेऊन जाण्याच्या दृष्टीने आणि पुढील विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्या करण्यासाठी पक्षाचे राज्य प्रभारी संजय सिंह हे देखील या संमेलनत सहभागी होणार आहेत. राजस्थानमध्ये 2023 च्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.
लवकरच प्रेदेशाध्यक्षाची घोषणा -
जागीरदार म्हणाले, राजस्थानात पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा लवकरच करण्यात येईल. पक्षातील काही नेत्यांनी म्हटल्याप्रमाणे, या संमेलनादरम्यान द्वारकाचे (दिल्ली) आपचे आमदार आणि माजी खासदार महाबल मिश्रा यांचा मुलगा विनय मिश्रा यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी दिली जाऊ शकते.