चंद्रयान-३ च्या यशानंतर इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी घेतलं देवदर्शन, नंतर म्हणाले, विज्ञान आणि आध्यात्माचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 05:29 PM2023-08-27T17:29:03+5:302023-08-27T17:34:34+5:30
Chandrayaan-3 : चंद्रयान-३ मोहीम यशस्वी होऊन विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर सुखरूपपणे उतरल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी आज तिरुवनंतरपुरम येथील भद्रकाली मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
चंद्रयान-३ मोहिमेला मिळालेल्या यशामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. दपम्यान, चंद्रयान-३ मोहीम यशस्वी होऊन विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर सुखरूपपणे उतरल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी आज तिरुवनंतरपुरम येथील भद्रकाली मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सोमनाथ यांनी मी एक संशोधक आहे. मी चंद्राचा अभ्यास करत आहे. विज्ञान आणि आध्यात्मिकता दोघांचा शोध घेणं हा माझ्या जीवनाच्या प्रवासाचा एक भाग आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी चंद्रयान-३ च्या लँडर आणि रोव्हरबाबतही महत्त्वाची माहिती दिली. तसेच त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने माहिती मिळत असल्याचे सांगितले.
इस्रोचे प्रमुख सोमनाथ म्हणाले की, मी एक संशोधक आहे. मी चंद्राचा अभ्यास करत आहे. विज्ञान आणि आध्यात्मिकता दोघांचा शोध घेणं हा माझ्या जीवनाच्या प्रवासाचा एक भाग आहे. त्यामुळे मी अनेक मंदिरात जातो. तसेच अनेक धर्मग्रंथांचं वाचन केलं आहे. त्यामुळेच मी आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी संशोधन करत असतो. हा एक प्रवास आहे, असे त्यांनी सांगितले.
#WATCH | On his visit to Pournamikavu, Bhadrakali Temple in Thiruvananthapuram, ISRO Chairman S Somanath says, "I am an explorer. I explore the Moon. I explore the inner space. So it's a part of the journey of my life to explore both science and spirituality. So I visit many… pic.twitter.com/QkZZAdDyX3
— ANI (@ANI) August 27, 2023
इस्त्रोच्या प्रमुखांनी पुढे सांगितले की, येणाऱ्या काही दिवसांमध्ये ३ सप्टेंबरपर्यंत आम्ही बरेचसे प्रयोग पूर्ण करण्याच्या स्थितीत असू, अशी मला अपेक्षा आहे. वेगवेगळ्या पद्धतीने चाचण्या घेणार आहोत. त्यानंतर चंद्रावर नेमकी स्थिती कशी आहे, याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे.
चंद्रयान-३ जिथे उतरले त्या ठिकाणाला शिवशक्ती असं नाव देण्याच्या निर्णयायाबबत विचारले असता सोमनाथ यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नामकरण केलं आहे. त्याचे अनेक अर्थ आहेत. तसेच ते आमच्यासाठी उपयुक्त आहे. त्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे. पंतप्रधानांनी पुढचं नावही सूचवलं आहे. ते तिरंगा आहे. दोन्ही भारतीय वाटणारी नावं आहेत. आपण जे करतो, त्याचं एक महत्त्व असतं. तसेच देशाचे पंतप्रधान असल्याने नामकरण करणे हा त्यांचा विशेषाधिकार आहे, असेही इस्त्रोच्या प्रमुखांनी सांगितले.