‘चंद्रयान’च्या यशानंतर आता ISRO लॉन्च करणार भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे स्पेस मिशन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 06:49 PM2023-08-24T18:49:22+5:302023-08-24T18:50:15+5:30

पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये गगनयानच्या माध्यमातून व्योममित्र रोबोट पाठवला जाईल.

After the success of 'Chandrayaan', now ISRO will launch the biggest space mission in the history of India Gaganyaan | ‘चंद्रयान’च्या यशानंतर आता ISRO लॉन्च करणार भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे स्पेस मिशन

‘चंद्रयान’च्या यशानंतर आता ISRO लॉन्च करणार भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे स्पेस मिशन

googlenewsNext

नवी दिल्ली – भारत लवकरच गगनयानचं ट्रायल मिशन लॉन्च करणार आहे. ही लॉन्चिंग एक ते दीड महिन्यात होण्याची शक्यता आहे. या प्रक्षेपणात मानवरहित यानला रॉकेटच्या माध्यमातून अंतराळात पाठवले जाईल. सर्व सिस्टमची तपासणी सुरू आहे. रिकवरी सिस्टम आणि टीमची पडताळणी होईल. या मिशनमध्ये भारतीय नौसेना आणि कोस्टगार्डही यांचाही समावेश आहे.

पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये गगनयानच्या माध्यमातून व्योममित्र रोबोट पाठवला जाईल. ISRO ने व्योममित्र महिला ह्यूमेनॉयड रोबोट २४ जानेवारी २०२० मध्ये समोर आणला होता. या रोबोटद्वारे देशातील पहिले मानव मिशन गगनयानच्या क्रू मॉडेलमधून अंतराळात पाठवून मानवी शरीराच्या हालचालींना समजून घेणे असेल. सध्या हे बंगळुरूत आहे. याला जगातील बेस्ट स्पेस एक्सप्लोरर ह्यूमेनॉयड रोबोट म्हणून खिताब मिळाला आहे.

व्योममित्र रोबोट माणसाप्रमाणेच काम करतो, तो गगनयानच्या क्रू मॉडेलमध्ये असलेले रिडिंग पॅनेल वाचेल. त्याचसोबत ग्राऊंड स्टेशनवर हजर असलेल्या वैज्ञानिकांसोबत संवाद साधेल. या मानवरहित मिशनचा जो परिमाण असेल त्यानंतर आणखी एक मानवरहित लॉन्च करण्यात येईल. तिसऱ्या लॉन्चिंगमध्ये भारतीय अंतराळवीरांना यात्रेवर पाठवले जाईल. इस्त्रोच्या पहिल्या योजनेनुसार, आपल्या ह्यूमेन स्पेसफ्लाइट मिशनमध्ये गगनयान(Gaganyaan) भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीच्या चारी बाजूने ७ दिवसांपर्यंत भ्रमण करेल. परंतु सध्याच्या स्थितीनुसार गगनयान केवळ एक अथवा ३ दिवसांच्या पृथ्वी भ्रमंतीसाठी लॉन्च केले जाईल.

मिशनमध्ये चुकीला माफी नाही

या मिशनमध्ये अशी कुठलीही चूक माफ केली जाणार नाही. कारण भारतीय वायूसेनेच्या सक्षम वैमानिकांना त्यात पाठवले जाईल. त्यांचा जीव अनमोल आहे. हे रॉकेट लॉन्च करण्यापूर्वी या मिशनच्या अनेक चाचण्या केल्या जातील. पुढील वर्षी लॉन्चिंगची तयारी केली आहे. परंतु ते मागे-पुढे होऊ शकते.

ISRO ने १३ मे २०२२ रोजी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून ह्यूमन रेटेड सॉलिड रॉकेट बूस्टर यशस्वीरित्या प्रक्षेपण केले होते. या बूस्टरला जीएसएलवी मार्क ३ रॉकेटच्या एस २०० बूस्टरजागी लावले जाईल. तामिळनाडू येथील महेंद्रगिरीमध्ये इस्त्रोच्या प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये विकास इंजिनला २४० सेकंद चालवले जात आहे. या चाचणीमध्ये, इंजिनने स्वत: ला निर्धारित मानकांनुसार सिद्ध केले. त्याने सर्व संभाव्य गणिते पूर्ण केली आणि चांगली कामगिरी केली. हे इंजिन रॉकेटच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये स्थापित केले जाईल, जे गगनयान कॅप्सूलला अवकाशात घेऊन जाईल.

बंगळुरूमध्ये गगननॉट्स प्रशिक्षण सुरू

भारतीय हवाई दलाच्या चार वैमानिकांनी रशियामध्ये गगनयानसाठी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. मॉस्कोजवळील जिओग्नी शहरात असलेल्या रशियन अंतराळ प्रशिक्षण केंद्रात त्यांना अंतराळवीर होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना गॅगरिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. सध्या त्यांना बंगळुरूमध्ये गगनयान मॉड्यूलमध्ये प्रशिक्षण दिले जाईल.

Web Title: After the success of 'Chandrayaan', now ISRO will launch the biggest space mission in the history of India Gaganyaan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.