जम्मू-काश्मिरात तीन महिन्यांनी रेल्वे रुळावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 04:16 AM2019-11-13T04:16:33+5:302019-11-13T04:16:47+5:30
काश्मिरातील कलम ३७० हटविल्यानंतर तीन महिन्यांनी काश्मिरात रेल्वेसेवा सुरू झाली आहे.
श्रीनगर : काश्मिरातील कलम ३७० हटविल्यानंतर तीन महिन्यांनी काश्मिरात रेल्वेसेवा सुरू झाली आहे. तथापि, बतवारा-बटवालू मार्गादरम्यान मिनी बस धावताना दिसल्या. खासगी वाहनेही रस्त्यांवर धावत होती. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बारामुला आणि श्रीनगरच्या दरम्यान मंगळवारी सकाळपासून रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. सुरक्षा कारणांमुळे रेल्वे केवळ सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेतच धावणार आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रीनगर-बनिहालदरम्यान रेल्वेसेवा काही दिवसांनंतर ट्रायल रन घेऊन सुरू करण्यात येईल. ५ आॅगस्ट रोजी रेल्वेसेवा बंद झाली होती. त्याला मंगळवारी १०० दिवस पूर्ण झाले. दरम्यान, आज सकाळी काही तासांसाठी बाजारपेठा खुल्या झाल्या होत्या. समाजविघातक शक्तींकडून ही दुकाने बंद केली जात आहेत.
>अतिरेकी ठार
जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात सुरक्षा दल आणि अतिरेकी यांच्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाला आणि सैन्याचा एक जवान जखमी झाला. कुलन भागात लपलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत हा अतिरेकी मारला गेला.