शिरसोली येथे तीन महिन्यांनी स्वस्त धान्य दुकानात आली साखर
By admin | Published: August 20, 2016 10:20 PM2016-08-20T22:20:37+5:302016-08-20T22:20:37+5:30
शिरसोली : विविध कार्यकारी सोसायटीमार्फत चालविण्यात येणार्या स्वस्त धान्य दुकानावर मे महिन्याच्या सारखेचे नियतन तब्बल तीन महिन्यांनी आले आहे. काळ्या बाजारात विक्री झालेली ही साखर गावात चर्चा झाल्याने पुन्हा स्वस्त धान्य दुकानावर आल्याची चर्चा शिरसोली गावात आहे.
Next
श रसोली : विविध कार्यकारी सोसायटीमार्फत चालविण्यात येणार्या स्वस्त धान्य दुकानावर मे महिन्याच्या सारखेचे नियतन तब्बल तीन महिन्यांनी आले आहे. काळ्या बाजारात विक्री झालेली ही साखर गावात चर्चा झाल्याने पुन्हा स्वस्त धान्य दुकानावर आल्याची चर्चा शिरसोली गावात आहे.शिरसोली येथील विविध कार्यकारी सोसायटीला स्वस्त धान्य दुकान देण्यात आले आहे. या दुकानावर मे महिन्याचे साडे पाच क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त झाले होते. मात्र प्रत्यक्षात ही साखर स्वस्त धान्य दुकानावर आलेली नव्हती. याबाबत गोपाल नामदेव बारी यांनी माहिती काढली असता पुरवठा विभागाकडून या साखरेची खरेदी झालेली असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून मिळाली. त्यानंतर या प्रकाराबाबत त्यांनी सचिव दोधू कणखरे यांना विचारणा केली. या घटनाक्रमानंतर काही दिवसात दुकानावर या साखरेचे नियतन प्राप्त झाले. रेशनवरील या साखरेची काळ्या बाजारात विक्री झाली असावी. मात्र चर्चा झाल्यामुळे पुन्हा साखरेची खरेदी करण्यात आल्याची चर्चा शिरसोली गावात आहे.याबाबत विकासो सचिव दोधू कणखरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एकटा कर्मचारी असल्याने मे महिन्याच्या साखरेचे नियतन या महिन्यात उचलल्याचे वार्ताहराशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)