तिकीट वाटपानंतर गुजरात भाजपामध्ये नाराजीचे सूर, खासदाराने दिली राजीनाम्यांची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 10:38 PM2017-11-19T22:38:20+5:302017-11-19T22:38:34+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र या याद्या प्रसिद्ध झाल्यापासून गुजरात भाजपामधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

After the ticket distribution, the BJP's resignation from the BJP, the MP threatened to resign | तिकीट वाटपानंतर गुजरात भाजपामध्ये नाराजीचे सूर, खासदाराने दिली राजीनाम्यांची धमकी

तिकीट वाटपानंतर गुजरात भाजपामध्ये नाराजीचे सूर, खासदाराने दिली राजीनाम्यांची धमकी

Next

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र या याद्या प्रसिद्ध झाल्यापासून गुजरात भाजपामधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. त्याचच पाटण येथील भाजपा खासदार लीलाधर वाघेला यांनी तर आपल्या मुलाला तिकीट न मिळाल्यास पक्षाचा राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये पक्षातील नाराजांची समजूत काढण्यासाठी भाजपाच्या नेत्यांना धावपळ करावी लागणार आहे. 
गुजरात विधानसभेच्या 182 जागांपैकी एकूण 106 जागांसाठी भाजपाकडून उमेदवारांची घोषणा झाली आहे.  या घोषणेनंतर भाजपामधील नाराजी उफाळून आली आहे. काही ठिकाणी विद्यमान आमदारांना तिकीट दिल्याने कार्यकर्ते नाराज आहेत, तर काही ठिकाणी नवे उमेदवार दिल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत.  
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यादीत काँग्रेसमधील पाच बंडखोर व ४० विद्यमान आमदार आहेत. या यादीत भाजपने १६ नव्या चेह-यांनाही संधी दिली आहे. त्यानंतर शनिवारी भाजपाने 36 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. 
१८२ सदस्यांच्या विधानसभेसाठी ९ व १४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. राघवजी पटेल, धर्मेंद्रसिंह जाडेजा, रामसिंह परमार, मानसिंह चौहान आणि सी. के. रावोलजी यांचा बंडखोरांत समावेश आहे. या पाचही जणांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत, तसेच राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अहमद पटेल उभे असताना भाजपला पाठिंबा दिला होता. राजकोट (पश्चिम) मतदारसंघातून मुख्यमंत्री विजय रुपानी यांना उमेदवारी दिली गेली आहे. उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल हे मेहसाना व गुजरात प्रदेश भाजपचे अध्यक्ष जितूभाई वाघानी हे भावनगर मतदारसंघातून उमेदवार आहेत.

Web Title: After the ticket distribution, the BJP's resignation from the BJP, the MP threatened to resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.