लोकसभा निवडणुकीसाठी आता मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुआ-बबुआची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 04:42 PM2019-02-25T16:42:19+5:302019-02-25T16:43:53+5:30

समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाजवादी पार्टी (बसपा) ने उत्तर प्रदेशात ऐतिहासिक आघाडी केल्यानंतर आता उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात सुद्धा एकत्र आगामी लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

after uttar pradesh sp bsp alliance goes to uttarakhand and madhya pradesh for upcoming loksabha election | लोकसभा निवडणुकीसाठी आता मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुआ-बबुआची आघाडी

लोकसभा निवडणुकीसाठी आता मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुआ-बबुआची आघाडी

googlenewsNext
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीसाठी आता मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुआ-बबुआची आघाडीमध्य प्रदेशात लोकसभेसाठी 29 जागा आहेत. तर उत्तराखंडमध्ये 5 जागा आहे.मध्य प्रदेशात समाजवादी पार्टी फक्त तीन जागा लढवणार आहे. तर बाकीच्या बहुजन समाज पार्टी लढवणार आहे.

लखनऊ : समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाजवादी पार्टी (बसपा) ने उत्तर प्रदेशात ऐतिहासिक आघाडी केल्यानंतर आता उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात सुद्धा एकत्र आगामी लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. 

गेल्या काही दिवसांपूर्वी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने आघाडी करत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात 80 पैकी 76 जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशात समाजवादी पार्टी फक्त तीन जागा लढवणार आहे. तर बाकीच्या बहुजन समाज पार्टी लढवणार आहे. मध्य प्रदेशातील बालाघाट, टीकमगड, खजुराहो या तीन जागांवर समाजवादी पार्टीचे उमेदवार असणार आहेत. दुसरीकडे, उत्तराखंडमध्ये समाजवादी पार्टीने फक्त एकाच जागेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येथील पौडी गढवाल मतदार संघातून समाजवादी पार्टी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. 


दरम्यान, मध्य प्रदेशात लोकसभेसाठी 29 जागा आहेत. तर उत्तराखंडमध्ये 5 जागा आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यातील प्रत्येकी 38 जागा लढवणार आहेत. तर दोन जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत. याशिवाय अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्ये दोन्ही पक्ष उमेदवार देणार नाहीत. 
 

Web Title: after uttar pradesh sp bsp alliance goes to uttarakhand and madhya pradesh for upcoming loksabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.