वर्षानुवर्षे संसार, तरी पती-पत्नी करताहेत एकमेकांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 09:39 AM2024-02-05T09:39:41+5:302024-02-05T09:40:04+5:30

पाश्चात्त्य संस्कृती, पैसा नात्यांमध्ये कालवतोय विष; नव्या अहवालातून माहिती समोर

After years of life, husband and wife cheat on each other | वर्षानुवर्षे संसार, तरी पती-पत्नी करताहेत एकमेकांची फसवणूक

वर्षानुवर्षे संसार, तरी पती-पत्नी करताहेत एकमेकांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पाश्चात्त्य संस्कृती, पैशाचा वाढता मोह, इंटरनेट आणि सोशल मीडियावरील वाढती अश्लीलता केवळ कुटुंबच नाही, तर पती-पत्नीच्या नात्यातही विष कालवत आहे. हे विष इतके प्राणघातक ठरते आहे की, वर्षानुवर्षे संसार सांभाळणारे पती-पत्नीही आता एकमेकांची फसवणूक करत आहेत. भारतासह आशियाई-युरोपीयन देशांमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, प्रेमात धोका किंवा फसवणूक कोण

त्या ना कोणत्या प्रकारे वय, शारीरिक बदल, शिक्षण आणि मूल्यांशी संबंधित आहे. याकडे एकाच दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकत नाही.

या अभ्यासानुसार, अशा प्रकरणांमध्ये, सरासरी स्त्रिया लग्नाच्या सात वर्षांनंतर आपल्या पतीची फसवणूक करण्याचा विचार करू लागतात, तर पती तीन वर्षांनंतर फसवणूक करण्याचा विचार करू लागतात. डेटा एजन्सी बेडबायबल रिसर्च सेंटर २०२३ च्या अहवालानुसार, २३% लोक त्यांच्या साथीदारांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फसवत आहेत. १४% लोकांनी त्यांच्या सध्याच्या जोडीदाराची फसवणूक केल्याचे मान्य केले आहे. यामध्ये २१% पुरुष आणि ७% महिलांचा समावेश आहे. 

 

पकडण्याची भीती तरीही...
भारतासह आशियाई देशांबद्दल बोलायचे, तर १० पैकी ७ पुरुष आणि ६ महिला आपण पकडले न जाण्याची शक्यता असल्यास फसवणूक करण्यास तयार असतात. मात्र, यातील १७% लोक जोडीदाराकडून पकडले जातात. ६०% प्रकरणे जवळच्या मित्र किंवा सहकाऱ्यांसोबत असतात.

१९ ते २९ वर्षांतील महिला अधिक धोकेबाज 
nभारतात सरासरी १९ ते २९ वर्षे वयोगटांतील महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक फसवणूक करतात. 
nया वयात ४०% महिलांनी जोडीदाराची फसवणूक 
केली, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण केवळ 
२१ टक्के आहे. 

विवाहबाह्य संबंध हा गुन्हा कुठे? 
इंडोनेशियाने विवाहबाह्य संबंध हा गुन्हा ठरविला आहे. सोमालिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, फिलिपिन्स इत्यादी देशांमध्येही विवाहबाह्य संबंध ठेवल्यास शिक्षेची तरतूद आहे. अमेरिकेतील काही राज्यांमध्येही हे बेकायदा आहे. भारतात विवाहबाह्य संबंध हा गुन्हा मानला जात होता, परंतु २७ सप्टेंबर, २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी तो घटनाबाह्य ठरविला आहे. 

नेमकी कारणे काय आहेत? 
भारतात जोडीदाराची फसवणूक करण्याचे सर्वाधिक प्रमाण बेंगळुरूमध्ये आहे. त्यानंतर, मुंबई आणि कोलकाता शहराचा नंबर लागतो. ऑफिसात एकत्र काम करणे हे त्याचे मोठे कारण आहे. जोडीदाराने फसवणूक केली, तरी त्याला सुधारण्याची संधी भारतात ५५% दिली जाते. महिला पुरुषाला ही संधी ७०% देतात.

Web Title: After years of life, husband and wife cheat on each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.