अफझल गुरूच्या मुलाने दहावीत मिळवले ९५ टक्के गुण
By admin | Published: January 11, 2016 12:46 PM2016-01-11T12:46:41+5:302016-01-11T12:46:41+5:30
संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी फाशी दिलेल्या अफझल गुरूच्या मुलाने घालिब गुरुने १०वी च्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ११ - संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी फाशी दिलेल्या अफझल गुरूच्या मुलाने घालिब गुरुने १०वी च्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवले आहेत. मोहम्मद अफझल गुरुला तीन वर्षांपूर्वी फाशी देण्यात आले होते.
जम्मू व काश्मिर शालेय मंडळाने रविवारी दहावीचे निकाल जाहीर केले. त्यात घालिबने ५०० पैकी ४७४ गुण मिळवत ९५ टक्के एवढे यश प्राप्त केल्याचे दिसत आहे. सगळ्या विषयांमध्ये त्याला ए१ गी श्रेणी मिळाली आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक म्हणजे ५०० पैकी ४९८ गुण मिळवत ताबिश मन्झूर खान या विद्यार्थ्याने पहिला क्रमांक पटकावला असून गेल्या काही वर्षांमधली विद्यार्थिनींची पहिल्या क्रमांकाची मक्तेदारी मोडली आहे. अनीसा हालीन व हिबा इन्तिखाब या मुलींनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.