आगोद सरपंचांवर प्रश्नांचा भडीमार
By admin | Published: August 3, 2015 12:13 AM2015-08-03T00:13:34+5:302015-08-03T00:13:34+5:30
ग्रामसभेत खडाजंगी : पाणी टंचाईवर तोडगा क ाढण्याची मागणी
Next
ग रामसभेत खडाजंगी : पाणी टंचाईवर तोडगा क ाढण्याची मागणीकाणकोण : काणकोण तालुक्यातील आगोंद पंचायतीची ग्रामसभा रविवारी प्रश्नोत्तरांनी बरीच गाजली. सरपंच नवनिता नाईक गावकर यांच्यावर ग्रामस्थांनी आगोंद पंचायतीच्या विकासकामावरून प्रश्नांचा भडिमार करून नाकीनऊ आणले. याबाबत सरपंच नाईक गावकर म्हणाल्या, पंचायत क्षेत्रातील विकासकामे करण्याचा प्रस्ताव होऊन क्रीडामंत्र्याची भेट घेतली. तेव्हा मंत्र्यांनी खोला मतदारसंघात जिल्हा पंचायत उमेदवाराचा पराजय झाल्याचे सांगून आगोंद पंचायत क्षेत्रातील विकासकामे करण्याबाबत उदासीनता दर्शविली.क्रीडामंत्र्यांनी जर असे सांगितले तर आपण यासंदर्भात कुठलीही प्रतिक्रिया का दिली नाही, असे ग्रामस्थांनी विचारल्यावर सरपंच निरुत्तरीत झाल्या. याबाबत एकदा पंचायत मंडळाच्या बैठकीत सरपंचांना विचारले असता तेव्हाही सरपंचांनी काही सांगीतले नसल्याचे एका पंच सदस्याने सांगितले.याबाबत क्रीडामंत्र्यांशी संपर्क साधला असता अशाप्रकारच्या विकासकामांचा असा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आला नसून आपण उदासिनता दाखविण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले. या शिवाय आपण आगोंद पंचायत क्षेत्रात बरीच विकासकामे केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातच यापुढे अंदाजे 3 कोटी रुपये कामाच्या निविदा निघाल्याचे त्यांनी सांगितले. बॉक्सपाणी प्रश्नावरून ग्रामस्थांनी खडसावलेया ग्रामसभेत पाण्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थांनी सरपंचांना बरेच खडसावले व मे महिन्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नाबाबत आताच उपाययोजना आखण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे श्ॉक्स प्रश्नावरूनही बरीच खडाजंगी झाली. गेल्या हंगामात घालण्यात आलेली पर्यटन कुटीरे अजूनही तशीच आहेत. ती हटवली नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कुटिरे त्वरित हटवण्याची मागणी केली. त्या शिवाय पर्यटन हंगामात पर्यटन खात्याकडून परवानगी घेऊन घालण्यात येणार्या श्ॉक्सवर पंचायतीतर्फे कर बसविण्याची मागणी केली. यामुळे पंचायतीच्या उत्पन्नात भर पडेल, असेही ग्रामस्थांतर्फे सांगण्यात आले. चर्चेत सदानंद देसाई, माकरुस फर्नांडिस, नारायण देसाई, गोडविन फर्नांडिस, प्रमोद फळदेसाई, विनोद फळदेसाई यांनी भाग घेतला. (लो. प्र.)