पुन्हा आंदोलन करणार नाही, दगडफेकीत जखमी विद्यार्थिनीचा निर्धार

By admin | Published: April 24, 2017 11:41 AM2017-04-24T11:41:45+5:302017-04-24T11:41:45+5:30

काश्मीरमध्ये दगडफेकीत जखमी झालेल्या एका मुलीनं पुन्हा दगडफेक करणार नसल्याचा निर्धार केला

Again, the determination of the injured student is not going to agitate | पुन्हा आंदोलन करणार नाही, दगडफेकीत जखमी विद्यार्थिनीचा निर्धार

पुन्हा आंदोलन करणार नाही, दगडफेकीत जखमी विद्यार्थिनीचा निर्धार

Next

ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 24 - काश्मीरमध्ये दगडफेकीत जखमी झालेल्या एका मुलीनं पुन्हा दगडफेक करणार नसल्याचा निर्धार केला आहे. दगडफेक करण्यासाठी आलेल्या 17 वर्षीय इकरा हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. माझ्यावर का दगडफेक करण्यात आली, माझी काय चुकी आहे, पुन्हा मी सुरक्षा दलांविरोधात प्रदर्शन करणार नसल्याचं तिने सांगितलं आहे.

गेल्या आठवड्यात पुलवामा येथील कॉलेजमध्ये आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांमध्ये इकराचाही समावेश होता. त्यात पोलीस आणि लष्कराच्या कारवाईत डझनांहून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. गेल्या बुधवारी पुलवामा कॉलेजमधील पोलिसांच्या कारवाईविरोधात शांतीपूर्ण स्थितीत प्रदर्शन करण्यात आले होते. मात्र त्याच वेळी सैनिकांनी शस्त्रास्त्रांसह कॉलेजमध्ये छापा टाकला, असं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. तर लष्कराच्या मते, ते एका कला प्रदर्शनाच्या चर्चेसाठी प्रिन्सिपलची भेट घेण्यासाठी गेले होते. कॉलेजमध्ये लष्करानं प्रवेश केल्यानं विद्यार्थ्यांना दगडफेक करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं.

दोन दिवसांनंतर कॉलेजच्या बाहेर सुरक्षा कडे निर्माण करण्यात आले होते. बराच वेळ सुरक्षा कड्यांनी कॉलेजला घेरल्यामुळे विद्यार्थ्यांनी दगडफेक केली आहे. त्यानंतर लष्करानं पेलेट गनचा वापर करून जनक्षोभ क्षमवण्याचा प्रयत्न केला. मग फुटीरतावादी काश्मीर विद्यार्थ्यांच्या युनियननं सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रदर्शन करण्याचं आवाहन केलं होतं. इकराची बहीण साइमा म्हणाली, इकरा शांतीपूर्ण पद्धतीनं आंदोलन करत होती. तिच्यासोबत इतरही विद्यार्थी शांततापूर्वक आंदोलन करत होते. आम्ही कॉलेजमध्ये दगडफेक करण्यासाठी जात नाही, तर अभ्यास करण्यासाठी जातो. आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांनी सीआरपीएफच्या बंकरजवळ दगडफेक केली. इकराला गंभीर दुखापत झाल्यामुळे ती काही बोलू शकत नाही. वरून दगड आला नि मला लागला, असं इकरानं सांगितलं आहे. 9 सदस्य असलेल्या इकराच्या परिवाराचा पूर्ण खर्च तिचे वडील उचलतात. तिच्या दुखापतीवर वडिलांना अधिकचा खर्च करावा लागतोय. त्यामुळेच तिने पुन्हा आंदोलन करणार नसल्याचं घोषित केलं आहे.

Web Title: Again, the determination of the injured student is not going to agitate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.