पुन्हा पाणी संघर्ष, कावेरी पाणी वाटपावरुन तामिळनाडूत रेले रोको

By admin | Published: October 17, 2016 04:17 PM2016-10-17T16:17:39+5:302016-10-17T16:17:39+5:30

जलव्यवस्थापन मंडळाची स्थापना करावी, या मागणीसाठी तामिळनाडूमधील शेतकरी संघटनांनी चेन्नई आणि थंजावूरमध्ये रेले रोको आंदोलनाला सुरुवात केली आहे.

Again, water fight, Raleigh Raleigh in Tamilnadu to distribute Kaveri water | पुन्हा पाणी संघर्ष, कावेरी पाणी वाटपावरुन तामिळनाडूत रेले रोको

पुन्हा पाणी संघर्ष, कावेरी पाणी वाटपावरुन तामिळनाडूत रेले रोको

Next

ऑनलाइन लोकमत

चेन्नई दि. 17 - तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा पाणीसंघर्ष सुरू झाला आहे. जलव्यवस्थापन मंडळाची स्थापना करावी, या मागणीसाठी तामिळनाडूमधील शेतकरी संघटनांनी चेन्नई आणि थंजावूरमध्ये रेले रोको आंदोलनाला सुरुवात केली आहे. कावेरी जलव्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने देऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर, शेतक-यांनी 48 तासांसाठी  रेले रोको आंदोलन पुकारले आहे. शेतक-यांच्या या आंदोलनाला डीएमकेने पाठिंबा दर्शवला असून पक्षाचे नेतेही यात सहभागी झाले आहेत.डीएमकेचे एमके स्टॅलिन देखील चेन्नईतील पेरंबूर येथे आंदोलनात सहभाग झाले होते. दरम्यान, कर्नाटक आणि तामिळनाडूतील परिस्थिती गंभीर असल्याचा अहवाल सुप्रीम कोर्टाच्या समितीने सादर केला आहे. 
 
'कर्नाटकातील जवळपास 42 तालुक्यांना दुष्काळाचा फटका बसतो आहे. दुष्काळामुळे मंड्या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. पाण्याअभावी शेतकरी आणि मच्छिमारांसमोर बेरोजगारी आणि आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. तर तामिळनाडूमध्ये जनावरांसाठीदेखील पाणी नाही. तसेच संबंधित राज्यांनी सिंचनाच्या व्यवस्थापनेसाठी शेतीसाठी पाण्याचे समसमान वाटप करण्याची गरज आहे', असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, तामिळनाडूला कावेरीतून पाणी सोडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने कर्नाटकाला दिलेले असतानाही पाणी सोडणार नाही असे सांगत कर्नाटक सरकारने विरोध दर्शवला आहे. गेल्या महिन्याभरापासून पाणी संघर्षावरुन तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये हिंसक आंदोलने सुरू आहेत. 
 

Web Title: Again, water fight, Raleigh Raleigh in Tamilnadu to distribute Kaveri water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.