शीखविरोधी दंगलींचा पुन्हा तपास?
By admin | Published: February 2, 2015 04:05 AM2015-02-02T04:05:16+5:302015-02-02T04:05:16+5:30
दिल्लीतील शीखविरोधी दंगलींचे भूत ३० वर्षांनंतरही उतरायला तयार नाही. मोदी सरकारने नियुक्त केलेल्या समितीने विशेष तपास
नवी दिल्ली : दिल्लीतील शीखविरोधी दंगलींचे भूत ३० वर्षांनंतरही उतरायला तयार नाही. मोदी सरकारने नियुक्त केलेल्या समितीने विशेष तपास चमू (एसआयटी) स्थापण्याची शिफारस केलेली पाहता नव्याने तपास होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
गेल्या वर्षी २३ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जी.पी.माथूर यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या समितीने या दंगलींचा नव्याने तपास करण्याची शक्यता पडताळण्याची शिफारस केली असून, गेल्याच आठवड्यात गृहमंत्री राजनाथसिंग यांना अहवाल सादर केला आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३१ आॅक्टोबर १९८४ रोजी हत्या झाल्यानंतर शीखविरोधी दंगलींचे लोण पेटले होते. त्यावेळी वेगवेगळ्या राज्यांमध्ये ३,३२५ शीखबांधव मारले गेले.
त्यातील एकट्या दिल्लीतील २७३३ लोक होते. उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राज्यातही दंगली झाल्या होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)