ंआयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाला विरोध

By admin | Published: March 29, 2016 12:24 AM2016-03-29T00:24:49+5:302016-03-29T00:24:49+5:30

कर्मचार्‍यांची मागणी : खासदार ईश्वरलाल जैन यांना दिले निवेदन

Against the privatization of IDBI Bank | ंआयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाला विरोध

ंआयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाला विरोध

Next
्मचार्‍यांची मागणी : खासदार ईश्वरलाल जैन यांना दिले निवेदन
जळगाव : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाविषयी भूमिका मांडली आहे. याला विरोध करण्यासाठी बँक कर्मचारी २८ पासून संपावर गेले आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोचविण्यासाठी बँक कर्मचार्‍यांनी खासदार ईश्वरलाल जैन यांना सोमवारी निवेदन दिले.
या निवेदनात, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाची भूमिका मांडून बँकेतील सरकारी भागेदारी ५१ टक्के पेक्षा कमी करण्याची घोषणा केली होती. सरकारच्या या निर्णयाला बँक कर्मचार्‍यांकडून विरोध केला आहे. बँकेला ५१ वर्षांचा इतिहास असून राष्ट्रउभारणीत वेगवेगळ्या स्तरावर बँकेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शासनाच्या प्रस्तावित खाजगीकरणाला बँकेच्या सर्व कर्मचार्‍यांनी युनायटेड प्लॅटफार्म आयडीबीआय बँक युनियन्सच्या माध्यामातून विरोध व्यक्त केला आहे. शासनस्तरावर आपण वैयक्तिक लक्ष घालून कर्मचार्‍यांची भूमिका सरकारपर्यंत पोचविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
कर्मचार्‍यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तो अर्थमंत्री व सरकारच्या समोर मांडणार असल्याचे आश्वासन खासदार जैन यांनी यावेळी युनायटेड प्लॅटफार्म आयडीबीआय बँक युनियन्सच्या शिष्टमंडळला दिले. यावेळी युनियनचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्मचार्‍यांच्या मागण्या
बँकेचे खाजगीकरण रोखणे, कर्मचार्‍यांची पाच वर्षांपासूनची प्रलंबित वेतनवाढ करणे. या मुख्य मागण्यांसाठी बँकेचे अधिकारी व कर्मचारी युनायटेड प्लॅटफार्म आयडीबीआय युनियन्सच्या माध्यमातून २८ पासून संपावर गेले आहेत.

Web Title: Against the privatization of IDBI Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.