वय ९५ , प्रवास अर्ध्या जगाचा

By admin | Published: March 13, 2017 12:36 AM2017-03-13T00:36:24+5:302017-03-13T00:36:24+5:30

या महिलेचे नाव आहे अन्नाकुटी सायमन. केरळातील सुरम्य गावातील या महिलेचे वय आहे ९५ वर्षे. आतापर्यंत या महिलेने अर्ध्या जगाचा प्रवास केला आहे.

Age 9 5, half of world travel | वय ९५ , प्रवास अर्ध्या जगाचा

वय ९५ , प्रवास अर्ध्या जगाचा

Next

तिरवनंतरपूरम : या महिलेचे नाव आहे अन्नाकुटी सायमन. केरळातील सुरम्य गावातील या महिलेचे वय आहे ९५ वर्षे. आतापर्यंत या महिलेने अर्ध्या जगाचा प्रवास केला आहे. ७५ व्या वर्षीच या महिलेने पूर्ण भारतात प्रवास पूर्ण केला होता. सर्व लोक त्यांना अम्मा नावाने ओळखतात. पतीच्या निधनानंतर त्यांनी जगात अनेक देशात भटकंती केली. त्या म्हणतात की, वय वाढले म्हणून काय झाले? मनाने मी तरुणच आहे. इटली, जर्मनी, इस्त्रायल, फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात आदी अनेक देशात त्या फिरुन आल्या आहेत. त्या भारतीय पोशाखातच वावरतात. येरुशेलममध्ये जाण्याची त्यांची इच्छा आहे. पण, वयोमानामुळे त्यांना व्हिसा मिळत नाही. जीवनाकडे सकारात्मकतेने बघणाऱ्या अम्मांबाबत लोकांमध्ये मोठा आदर आहे.

Web Title: Age 9 5, half of world travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.