वय वाढलं पण समज नाही - पंतप्रधान मोदींची राहूल गांधींवर अप्रत्यक्ष टीका

By admin | Published: March 3, 2016 12:55 PM2016-03-03T12:55:33+5:302016-03-03T13:51:13+5:30

संसदेच कामकाज चालू दिल जातं नाही यावर विचार करण्याची गरज आहे. मात्र विरोधकांमधील न्यूनगंडामुळेच विरोधक संसदेच कामकाज चालू देत नसल्याचा आरोप मोदींनी केला आहे

Age increases but no sense - Indirect criticism of PM Modi's Rahul Gandhi | वय वाढलं पण समज नाही - पंतप्रधान मोदींची राहूल गांधींवर अप्रत्यक्ष टीका

वय वाढलं पण समज नाही - पंतप्रधान मोदींची राहूल गांधींवर अप्रत्यक्ष टीका

Next
>
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ३ - काही जणांना वय वाढलं तरी बऱ्याच गोष्टी उशीरा लक्षात येतात, आणि काहीवेळा तर लक्षातच येत नाहीत असं सूचकपणे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी राहूल गांधींवर बोचरी टीका केली. संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना मोदींनी काँग्रेसवर अत्यंत उपहासात्मक पद्धतीनं घणाघाती हल्ला चढवला. साठ वर्षे झाली तरी गरीबी गेली नाही कारण काँग्रेसनेच गरीबीची मूळं या देशात घट्ट केली आणि मनरेगासारख्या योजना आजही सुरू ठेवाव्या लागण्याची मजबुरी आली असे ते म्हणाले. आमची प्रत्येक योजना काँग्रेसचीच असल्याचा आरोप केला जातो, असं सांगताना काँग्रेस तर रेल्वेपण आम्हीच सुरू केली असा दावा करतील असंही उपहासानं सांगितलं. काँग्रेसच्या अनेक योजना आम्ही सुरू ठेवल्या आहेत, मात्र, त्या कार्यक्षम केल्या आहेत आणि त्यांच्यातील भ्रष्टाचार समूळ उपटण्याचा प्रयत्न केला आहे असा दावा मोदींनी केला. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना प्रस्तावित केलेले एक विधेयक राहूल गांधींनी पत्रकार परिषदेत फाडून टाकले होते, याची आठवण करून देत अत्यंत ज्येष्ठ असलेल्या मनमोहन सिंगांशी असं वागणं दु:खदायक होतं असं संगितलं.
 
संसदेचं कामकाज चालू दिल जातं नाही यावर विचार करण्याची गरज आहे. मात्र विरोधकांमधील न्यूनगंडामुळेच विरोधक संसदेच कामकाज चालू देत नसल्याचा आरोप मोदींनी केला आहे. संसदेचं कामकाज चालू न देणं हे देशाचं आणि विरोधकांचं नुकसान आहे. लोकांसाठी विरोधक संसदेच आवाज उठवत असतात आणि जर संसदेचं कामकाज होत नसेल तर हे लोकांचं आणि देशाचं नुकसान आहे. संसदेचं कामकाज होत नसल्याने देश चिंतित असल्याचं मोदी बोलले आहेत .
 
यावेळी बोलताना मोदींनी राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांचा दाखला देत त्यांचीच पत्र वाचून दाखवत विरोधकांना चिमटे काढले. लोकांच्या भल्यासाठी आणलेल्या योजना रोखून तुम्हाला काय मिळत ? असा सवालही विरोधकांना विचारला. 8 मार्चला महिला दिनानिमित्त फक्त महिला खासदारांना बोल दिलं जावं, तसंच एक आठवडा फक्त पहिल्यांदा निवडून आलेल्या नव्या खासदारांना बोलू दिलं जाव असा प्रस्तावही मोदींनी ठेवला आहे. मेक इन इंडिया' या देशासाठी असलेल्या कार्यक्रमाचीच खिल्ली का उडवण्यात येत आहे? हे मला समजत नाही. तो कार्यक्रम यशस्वी होत नसेल, तर त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं म्हणत मोदींनी राहुल गांधींना टोमणादेखील मारला आहे. 
 
मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे - 
 - भाषण करणा-या सदस्यांची स्तुती झाली तर कामचुकार सदस्यांचे काय होईल, या भितीने त्यांना बोलायला दिले जात नाही. विरोधकांकडून संसद चालू न देणे हे न्यूनगंडाचे लक्षण आहे
- जेव्हा गोंधळामुळे सदनाचे कार्य चालत नाही तेव्हा देशाचे आणि खासदारांचे सर्वात जास्त नुकसान होते - 
- सभागृहात या आधी जे जे काही घडले, संसद वारंवार ठप्प झाल्यामुळे देश चिंतेत आहे 
- संसदेत सर्वांना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे, संसदेची प्रतिष्ठा कायम राखली पाहिजे. हे मी नव्हे माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते 
- संसदेतील चर्चेत अडथळे आणल्यामुळे नुकसानच होते - 
- महत्वपूर्ण विधेयके पारित करण्यासाठी विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात सहकार्य करावे - 
 - जीएसटी विधेयक तुमचेच आहे, मात्र आता तुम्हीच ते रोखण्याचा प्रयत्न करत आहात 
- जागतिक महिला दिनी ( ८ मार्च) सभागृगात केवळ महिलांनाच बोलू द्यावे 
- संसदेच्या अधिवेशनात एक आठवडा केवळ नव्याने निवडून आलेल्यांना, पहिल्यांदाच खासदार बनलेल्यांना बोलण्याची संधी मिळायला हवी - 
- देशातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा हा चिंतेचा विषय आहे 
 - 'मेक इन इंडिया' या देशासाठी असलेल्या कार्यक्रमाचीच खिल्ली का उडवण्यात येत आहे? हे मला समजत नाही. तो कार्यक्रम यशस्वी होत नसेल, तर त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत 
- काही लोकांचं वय तर वाढतं पण त्यांच्याकडे समजूतदारपणा येत नाही 
- विरोधकांनी गरीबिची मूळं इतकी खोलवर रूतवली आहेत की ती सहजपणे उखडून काढता येत नाहीयेत 
 - विरोधकांनी त्यांच्या कार्यकाळात गरिबी मिटवली असती तर आज गरीबांसाठी असलेल्या योजनांची गरजच पडली नसती 
 - ६० वर्षाच्या काळात काँग्रेसकडून गरीबांचे भले झाले नाही. मनरेगा ही ६० वर्षांच्या अपयशाचे स्मारक आहे
 - तुम्ही आमच्यापेक्षा चांगलं काम कसं करू शकता, हेच शल्य, चिंता विरोधकांच्या मनात आहे
 - मनेरगामध्ये घोटाळा झाला या काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गेंच्या मताशी मी सहमत, कॅगच्या २०१२च्या अहवालात तेच नमूद केलं आहे
 - काँग्रेसची सत्ता असलेल्या चार राज्यांमध्ये अन्न सुरक्षा योजना लागू का केली नाही?
 - आम्हाला कोणीही प्रश्न विचारू शकतं, मात्र काही जणांना कोणीही काहीही विचारू शकत नाही
 - पंतप्रधानांनी काढलेला अध्यादेश फाडून टाकणं ही कुठली संस्कृती
 - इतरांना उपदेश करणं सोपं असतं, पण त्यांच स्वत: अाचरण करणं सर्वात कठीण असतं
 - आरोपांसोबत कसं जगायचं हे 14 वर्षात मी शिकलो आहे
 - आपण देशातील सव्वाशे कोटी नागरिकांना नोकरशाहीच्या भरवशावर नाही सोडू शकत
 - तुम्ही विरोधक अनुभवी लोक आहात, खांद्याला खांदा लावून आमच्यासोबत चला आणि आपण देशासाठी काहीतरी चांगल काम करू
 

Web Title: Age increases but no sense - Indirect criticism of PM Modi's Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.